इचलकरंजी : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रेशनकार्ड धारकांना आनंद शिधा वाटप करण्यात येत आहे.याच अनुषंगाने येथील दातार मळा परिसरात कै.बाळासाहेब माने सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात भाजप महिला आघाडीच्या चिटणीस सौ.योगिता दाभोळे यांच्या हस्ते रेशनकार्ड धारकांना आनंद शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सौ.योगिता दाभोळे यांनी राज्यातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी युती सरकारच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्ड धारकांना आनंद शिधा वाटप करण्यात येत असून याचा सर्वांनी लाभ घेवून सण आनंदाने साजरा करावा,असे आवाहन केले.
या कार्यक्रमास भाजप बुथ क्रमांक २१६ च्या महिला प्रमुख सौ.मनिषा नाईक ,संजीवनी माने , श्रीकांत संकपाळ,सौ.कन्याकुमारी भतगुणकी , आनंद संकपाळ ,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे , प्रकाश चौगुले ,
सौ.स्वाती कोल्हापुरे ,सौ.अलका शिखरे ,सौ.भारती शिखरे ,मधुमती तोरगुले ,सुरेखा गुळगी ,झाडे मावशी ,राजश्री देवरमणी , महानंदा बुक्का , ऐनापुरे भाभी ,शामल मोळे , गुरुनाथ भंडे , श्रीमती जाधव यांच्यासह रेशनकार्ड धारक ,भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते
व भागातील नागरिक उपस्थित होते.