लातूर ; दि.६ – लातूर शहरातील जेष्ठ महिला कार्यकर्त्या गंगाबाई अनंतराव कुलकर्णी ( वय ९४ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त कार्यशाळा अधीक्षक व जानाई प्रतिष्ठानचे सदस्य प्रा.नंदू उपाख्य रघुनाथ कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.
स्व. गंगाबाई यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास नेत्रदानानंतर त्यांचा देह एम.आय. टी. वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला. एकवीस वर्षांपूर्वी त्यांनी सामाजिक बांधिलकी , द्रुषटीदानातून कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाशाचा कवडसा दिसावा, व्रक्षसंवर्धन व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यास करुन संशोधन करण्यासाठी देह उपयोगी पडावा या हेतूने त्यांनी घेतलेला स्तुत्य निर्णय आजही समाज मनाला सहज मान्य होत नाही. त्यांनी २१ वर्षापूर्वी घेतलेला निर्णय किती पुरोगामी होता हे ध्यानी येईल. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परीवार आहे.