लातूर - *आज दि.11 सप्टेंबर 2022 रोजी खोपेगाव येथील मतदान केंद्रावरील बूथवर मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने व उपविभागीय अधिकारी साहेब सुनील यादव साहेब, तहसीलदार स्वप्नील पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर ठेवण्यात आले होते त्यानिमित्ताने खोपेगाव येथील मतदान केंद्राचे BLO माळी सर तसेच खोपेगावचे तलाठी साईनाथ सूर्यवंशी यांनी सकाळी पाऊस असताना देखील भर पावसात येऊन मतदान काढला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रियेला सुरुवात केली यावेळी गावातील मतदारांनी त्याला भर पावसात देखील मोठी गर्दी करून लाईन लाऊन मोठा प्रतिसाद दिला. भर पावसात देखील मतदारांनी छत्री घेऊन येऊन आपले मतदान कार्ड आधार कार्ड ची जोडून घेणे सुरुवात केली व गावातील बऱ्याच मतदारांनी मतदान काढला आधार कार्ड नोंदणी नोंदणी करून घेतली. विशेष म्हणजे वृद्ध मतदारांनी देखील आधार कार्ड लिंक करून घेतले.*