भाजपा महायुतीच्या अभूतपूर्व रॅलीने वेधले लातुरकरांचे लक्ष
मतदारसंघातील हजारो नागरिकांची उपस्थिती
लातूर/प्रतिनिधी ः लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शहरात काढण्यात आलेल्या अभूतपूर्व रॅलीने लातुरकरांचे लक्ष वेधले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

गुरुवारी सकाळी 9 वाजता गंजगोलाईतील जगदंबा देवीचे दर्शन व आशीर्वाद घेवून महारॅलीचा शुभारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे, राज्याचे मंत्री संजय बनसोडे, लोकसभा संयोजक तथा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे, आ. बाबासाहेब पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेशअप्पा कराड, लोकसभा प्रभारी तथा प्रदेश सचिव किरण पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, माजी आ. गोविंद केंद्रे, सुधाकर भालेराव, बब्रुवान खंदाडे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अॅड. बळवंत जाधव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, लातूर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, प्रेरणा होनराव, युवा मोर्चाचे अजित पाटील कव्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने, राष्ट्रवादीचे अॅड. व्यंकट बेद्रे, पंडित धुमाळ, प्रशांत पाटील, प्रविण पाटील चिखलीकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, शहर जिल्हाध्यक्षा रागिनी यादव, शिवसेनेच्या कल्पना बावगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, रिपाइंचे देविदास सोनकांबळे आदींसह मान्यवर नेते सहभागी झाले होते.
फुलांनी सजविलेल्या वाहनातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व मान्यवरांनी लातूरकर जनतेला अभिवादन केले. जगदंबा देवीची महाआरती करून दर्शन घेतल्यानंतर ही रॅली हनुमान चौक येथे पोहोचली. तेथे हनुमंतांचे दर्शन घेतल्यानंतर रॅली गांधीचौकाकडे मार्गस्थ झाली. विविध वाद्यांच्या गजरात व घोषणांच्या जयघोषात ही रॅली निघाली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साही घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता.

बसस्थानक, गांधी चौक या मार्गे ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहोचली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत रॅलीची सांगता झाली.

या रॅलीत युवा मोर्चाचे गणेश गोमचाळे, शिरिष कुलकर्णी, दिग्वीजय काथवटे, प्रविण सावंत, बाबू खंदाडे, रामचंद्र तिरुके, रमेश सोनवणे, गंगासिंह कदम, रवि सुडे, रविशंकर केंद्रे, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, शामसुंदर मानधना, भागवत सोट, ज्योतीराम चिवडे, वर्षा कुलकर्णी आदींसह मतदारसंघातून आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.