खा. सुधाकर शृंगारे आ. रमेशआप्पा कराड यांच्या
मुरुड शहरात गाठीभेटी; सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर दि.०१-( वृत्तसेवा )- लातूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे आणि भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी मुरुड शहरात शनिवारी सायंकाळी विविध ठिकाणी बैठका घेऊन संवाद साधला, गाठीभेटी घेतल्या यावेळी ठिकठिकाणी अनेकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लातूर तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या मुरुड शहरातील छ. शिवाजी चौक येथील सरस्वती हॉल, रमाईनगर नालंदा बौद्ध विहार, भीमनगर, चव्हाणवाडी, पारूनगर यासह विविध ठिकाणी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांसमवेत भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे आणि भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतबापू नागटिळक, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, संगायो समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड, मुरुडच्या सरपंच अमृताताई नाडे, अनंत कणसे, लताताई भोसले, सुधाकर गवळी, महेश कणसे, प्रताप पाटील, अंगद सूर्यवंशी, भैरव पिसाळ, कर्णदादा पुदाले यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी होते. विविध ठिकाणी झालेल्या बैठकीस समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितानी विचारलेल्या प्रश्नांना आ. कराड आणि खा. शृंगारे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर गेल्या दहा वर्षात संपूर्ण देशात विकासात्मक मोठा बदल झालेला आपण सर्वजण पाहत आहोत, यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी श्रीराम मंदिरासह अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गोरगरीब सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात गरजू लाभार्थ्यांना मिळाला. गेल्या दहा वर्षात मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होऊ शकला नाही विरोधकाकडे सक्षम नेतृत्व नाही तेव्हा केलेल्या विकास कामाच्या आधारावर आणि देशाच्या हितासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आशीर्वाद द्यावेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मुरुड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा योजना, उपजिल्हा रुग्णालय यासह अंतर्गत रस्ते नाल्या व इतर विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती देऊन ठिकठिकाणी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, काहीजणांनी खोडा घातला नसता तर मुरुड नगरपालिका झाली असती आणि मोठ्या प्रमाणात निधी विकास कामांना मिळाला असता. खा. सुधाकर शृंगारे यांनी जिल्ह्यातील अनेक विकास कामांना गती दिली दातृत्व असलेला साधा भोळा माणूस असून शृंगारे यांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे याची जाणीव ठेवून प्रचंड मताधिक्याने खा. शृंगारे यांना विजयी करावे असे आवाहन केले.
केंद्र शासनाने घेतलेल्या विविध निर्णयाची सविस्तर माहिती देऊन खा. सुधाकर शृंगारे म्हणाले की, भाजपा जातीवादी नाही मोदीजींनी सुरू केलेल्या विविध योजनांचा थेट लाभ जात धर्म पंथ न पाहता सर्वांना मिळत आहे. काँग्रेसवाले दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता देश हित डोळ्यासमोर ठेवून गोरगरिबांचे दैवत नरेंद्रजी मोदी यांना साथ द्यावी, आशीर्वाद द्यावेत असे आव्हान केले.
ठिकठिकाणी च्या बैठकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक यांनी आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून झालेल्या सुरू असलेल्या आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या विविध विकास कामाची माहिती दिली.
विविध ठिकाणी झालेल्या बैठकीस डॉ. बी. बी. बाहेती, माजी सैनिक विष्णू टेकाळे, डॉ. हनुमंतदास चांडक, नागराज बचाटे, राजकुमार नाडे, डॉ. हनुमंतदास मुंदडा, डॉ. खरबडे, काशिनाथ ढगे, वैजनाथ हराळे, ललित कुमट, बबलू सुराणा, दिलीप हंबीरे, संजय माळी, श्रुती सवई, सपना सय्यद, अंजली शिंदे, पल्लवी घोडके, योगेश पुदाले, पुरुषोत्तम सोनवणे, अंकुश कुंभार, प्रवीण पाटील, रवी नाडे, बाबा नाडे, महेश सुरवसे, भैरव नाडे, रवी माकोडे, लहू सव्वाशे, अंकित नाडे, अक्षय भोसले, खंडू कुंभार, शिवा शिंदे, अजित कुंभार, अरुण इंगळे, प्रशांत सागवे, प्रमोद देशमाने, बाळासाहेब कदम, दत्ता पोटभरे, पांडुरंग वाघमारे, सत्यम मस्के, पंकज टिळक, पंकज गायकवाड, सुमन आल्टे, राहुल लांडगे, महानंदा घोडके, रमेश सुरवसे, बाबा साळुंखे, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर नाडे, सुरज सूर्यवंशी, खंडू हजारे, कमलाकर कांबळे, अविनाश सवई, अनिल ढोबळे, मेघराज अंधारे, संजय भालेराव, किशोर सूर्यवंशी, श्याम चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, धनंजय मस्के यांच्यासह त्या त्या भागातील डॉक्टर, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.