महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, आ. कराड यांनी
रेणापूरच्या रेणुकादेवीचे गुडीपाडव्यादिवशी घेतले दर्शन
लातूर दि. १०- लातूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांनी गुढीपाडव्याच्या शुभदिनी रेणापूर येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती श्री रेणुका मातेची महापूजा करून आरती केली व आशीर्वाद घेतले यावेळी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाने लातूर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार श्री. सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा मंगळवार रोजी मतदार संघातील विविध ठिकाणच्या जागृत देवस्थानांना भेटी दिल्या. या दौऱ्यात असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या मंदिरात विधिवत पूजा करून खा. सुधाकर शृंगारे यांनी आरती केली व आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान खा. शृंगारे आणि आ. कराड यांचे रेणापूर शहर भाजपाच्या वतीने फटाके फोडून वाजंत्री वाजवून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा सुपर वॉरियर्स मराठवाडा प्रमुख अनिल काळे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेशदादा कराड, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, लोकसभा विस्तारक सिद्धेश्वर पवार, जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी, लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद आंबेकर, सांगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, अमर चव्हाण, चंद्रकांत कातळे, रमाकांत फुलारी, सुकेश भंडारे, शिवमुर्ती उरगुंडे, गणेश तूरूप, अच्युत कातळे, विजय चव्हाण, संतोष राठोड ,श्रीकृष्ण मोठेगावकर, दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, भागवत गीते, श्रीकृष्ण पवार, दिलीप चव्हाण, मारुती गालफाडे, हेमंत दरेकर, शरद राऊतराव, श्रीमंत नागरगोजे, शंकर शिंदे, राजकुमार आलापुरे, धम्मानंद घोडके, संतोष चव्हाण, मनोज चक्रे, उत्तम चव्हाण, लखन आवळे, अंतराम चव्हाण, शेख अजीम, सुरेश बुड्डे, अर्चना जाधव, राधिका पाटील, शिला आचार्य, अनुसया फड, आशाताई भिसे, कल्पना गुडे, शितल भिसे, गणेश माळेगावकर, नरसिंग येलगटे, किशन कुडके, दिलीप आकनगिरे, राजू अत्तार, सचिन शिरसकर, नंदकिशोर बंडे, लक्ष्मण खलंग्रे, दिलीप पाटील, रोहित खुमसे, श्याम चक्रे, ओम चव्हाण, सोहेल बागवान, अमर मारलापल्ले, सुभाष राठोड, बळीराम मुंडे, प्रताप भाबरे, श्रीराम पांचाळ यांच्यासह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, रिपाई आठवले गट, रासप व इतर महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.