देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी उदगीरचे साहित्य संमेलन महत्वपूर्ण ठरेल – खा.सुधारकर श्रृंगारे
उदगीर,-(प्रतिनिधी)-
95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयास महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात लातूर लोकसभा मतदार संघाचे खा. सुधाकर श्रृंगारे यांनी भेट देवून संमेलन तयारीचा आढावा घेतला. यावेळी मंचावर कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, समन्वयक दिनेश सास्तूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर.तांबोळी, , विलास आठवले, प्रा. पंडित सुर्यवंशी, संजय सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खा. श्रृंगारे यांचा संस्थचे अध्यक्ष नागराळकर यांच्या हस्ते फेटा बांधून शाल व ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा शाल, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्तविकात तिरुके म्हणाले मनुष्याच्या बुध्दीवर चांगल्या संस्कारासाठी संमेलनाचे आयोजन आहे. रमेश अंबरखाने यांनी श्रृंगारे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला. आठवले म्हणाले जीवनात शब्दामुळे आकार मिळतो. दगडे म्हणाले साहित्य संमेलन आपले समजून सर्वानी सक्रिय योगदान द्यावे. नागराळकर म्हणाले शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या खा. श्रृंगारे यांचा महाविद्यालयास गौरव आहे. माणूसकी व चांगल्या विचारांचे संस्कार या महाविद्यालयाने केले.
खा. श्रृंगारे म्हणाले शिक्षणाशिवाय प्रगतीसाठी पर्याय नाही. उदगीरच्या मातीत खूप ताकद आहे. इथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जगात कुठेही मागे पडत नाही. साहित्य संमेलनातुन साहित्यिकांनी देश आत्मनिर्भर व्हावा असे संस्कार लेखनातून मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. साहित्य संमेलनात भोजन प्रायोजकत्व स्विकारल्याची घोषणा खा. श्रृंगारे यांनी केली सूत्रसंचालन प्रा.डॉ गौरव जेवळीकर यांनी केले . आभार प्रा. प्रवीण जाहूरे यांनी मानले.