24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*खासदार राहूलजी गांधी यांच्यावर सुडबुध्दीने कार्यवाही-आ.अमित देशमुख*

*खासदार राहूलजी गांधी यांच्यावर सुडबुध्दीने कार्यवाही-आ.अमित देशमुख*

सत्ताधारी मंडळींकडून लोकशाही मुल्ये पायदळी

खासदार राहूलजी गांधी यांच्यावर सुडबुध्दीने कार्यवाही

भारतीय लोकशाहीचा लौकीक कायम राखण्यासाठी

काँग्रेस पक्ष लढाई लढणार

माजी मंत्रीआमदार अमित विलासराव देशमुख

लातूर प्रतिनिधी : शुक्रवार दि३१ मार्च २०२

देशात सध्या सत्ताधारी पक्षाकडून लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खा. राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कार्यवाही करण्यात येत आहे. जगभरातून या संदर्भाने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, भारताच्या लौकिकाला त्यामुळे हानी पोहोचत आहे. देशाना लौकीक कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात लढा उभारणार असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार कडून होत असलेल्या कारवाइचा निषेध करून देशात निर्माण झालेल्या अराजकतेची माहिती देण्यासाठी शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत  माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होत. या पत्रकार परीषदेस पक्षप्रतिनिधी आमदार राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी पूढे बोलतांना आमदार देशमुख म्हणाले की, देशात बेरोजगारी, महागाई यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना ते सोडवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, मात्र जनतेचा आवाज बनवून प्रश्न विचारणाऱ्या खा. राहुल जी गांधी यांच्यावर अत्यंत गतिमान पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.

या परिस्थितीत काँग्रेस पक्ष केंद्रातील अत्याचारी, जुलमी सत्तेला घाबरणार नाही, लोकशाही मूल्य जोपासणाऱ्या इतर सर्व राजकीय पक्ष व जनतेला सोबत घेऊन लोकशाही, संविधान व देश वाचवण्यासाठी लढाई लढून ती जिंकेल असा विश्वास आमदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

 अदानी आणि मोदी यांचा संबंध विचारल्यामुळेच

खासदार राहूल गांधी यांच्यावर कारवाई

याप्रसंगी आमदार राजेश राठोड म्हणाले की, ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलतांना काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी अदानी घोटाळया संदर्भात प्रश्न विचारले. अदानी उदयोग समूहातील सेल कंपन्यात गुंतवलेले २० हजार कोटी कोणाचे आहेत?  यात चिनी नागरीकांचा सहभाग आहे का? गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा सबंध काय आहे. पदेश दौऱ्यात पंतप्रधना सोबत गौतम अदानी कोणत्या अधिकारात गेले ? हे प्रश्न सरकारला हादरवून सोडणारे होत. या प्रश्नाची उत्तरे देऊ लागू नये म्हणून खासदार राहूल गांधी यांनाच संसदेतून बडतर्फ करण्याची खेळी केंद्रसरकारने केली आहे. खासदार राहूल गांधीचे हे प्रश्न देशातील जनतेचे प्रश्न आहेत. त्यामूळे काँग्रेस पक्ष आता जनतेला सोबत घेऊन सरकारला हे प्रश्न विचारणार असल्याचे आमदार राठोड यांनी म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांनीच संसदेचे

कामकाज चालू दिले नाही

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दयावी लागू नयेंत म्हणून या अधिवेशनात शासनाच्या सत्ताधारी मंडळीनीच संसदेचे काम चालू दिले नसल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षानी जेपीसीची मागणी करताच अदानीला वाचवण्यासाठी संसदेचे काम बंद पाडण्यात येत होते हेही त्यांनी निर्दशनास आणून दिले. शेवटी खासदार राहूल गांधी यांना बडतर्फ करून सरकारला वाचवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. खासदार राहूल गांधी यांनी संसदेत विचारलेले प्रश्न आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन सरकारला विचारणार अहोत असेही उटगे यांनी सांगितले. 

भाजपकडूनच ओबीसीचा अवमान

काँग्रेस पक्षाचे खासदार राहूल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपकडून धादात खोटा आरोप केला जात आहे. निरव मोदी, ललीत मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामूळे ओबीसी समाजाचा भृष्टाचारी लोकांशी संबंध जोडून भाजपच ओबीसी समजाचा अपमान करीत आहे ही बाब आम्ही जनतेला पटवून देणार असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी या पत्रकार परीषदेत सांगितले.

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर शहर मीडिया काँग्रेस सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, गोरोबा लोखंडे, फारुक शेख, इमरान सय्यद, सिकंदर पटेल, दीपक राठोड, दगडूआप्पा मिटकरी,  देविदास बोरुळे पाटील, अविनाश बट्टेवार, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर मीडिया काँग्रेस सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]