खासदार निंबाळकर यांची औशात बैठक

0
363

खासदार निंबाळकर यांची औशात बैठक

आज प्रशासकीय इमारत, औसा येथे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेची खरीप हंगाम – २०२१ पिक कर्ज संदर्भात बैठक घेतली. याबैठकीस प्रामुख्याने जिल्हा अग्रणी बँकेचे श्री.अनंत कसबे, सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.

आपला देश कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रावर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेती कसण्यासाठी आर्थिक मदत ही पीक कर्जाच्या स्वरूपात झाली पाहिजे. दत्तक बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांनी दर्शनी भागावर गावाची यादी लावण्यात यावी. तालुक्यातील पात्र शेतकरी कर्जपुरवठा पासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, पीक कर्ज संदर्भात लागणारी कागदपत्रे दर्शनी भागावरती लावण्यात यावीत.

प्रत्येक बँकेस नोडल ऑफिसर नेमण्यात यावा. शेतकरी बांधवांना सन्मापूर्वक वागणूक देण्यात यावी. तसेच RBI च्या नियमाप्रमाणे पीक कर्जासाठी आवश्यक असणारे कागद पत्र घेण्यात यावे. शेतकऱ्यांना दोन पेक्षा जास्त चकरा मारू देऊ नये, खरिप पीक कर्ज संदर्भात तालुका स्तरावर व्हॉट्स ग्रुप बनवावेत. जे शेतकरी कर्ज माफीस पात्र आहेत ज्यानचे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधक यांच्या कडे देण्यात यावी.

सरकारी योजनांची मेरिट लिस्ट प्रमाणे वाटप करावे, तसेच स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजकांना कर्जास मंजुऱ्या देण्यात याव्यात. दिलेले टार्गेट वेळेत पुर्ण करावे. अशा बैठकीत सुचना केल्या.

याबैठकी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार वृषाली केसकर, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औसा किशोर जाधव, उपसभापती खरेदी विक्री संघ औसा शेखर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख युवासेना दिनेश जावळे, श्रीधर साळुंके, उपतालुका प्रमुख औसा विशाल क्षिरसागर, शिवसेना सोशल मीडिया राहूल मोरे-पाटील, मुस्ताक शेख सचिव बाजार समिती औसा, मनोज शिंदे, ऋषी पाटवदकर, गणेश जाधव, धानोरा सरपंच सुर्यकांत मुसळे, गणेश गायकवाड युवासेना शहरप्रमुख गणेश गायकवाड, अमोल कठारे तसेच सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवस्थापक, बँक प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here