क्रांतिकारकांना अभिवादन

0
334

शास्त्री विद्यालयात क्रांतिदिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन

उदगीर:दि.९क्रांतिदिनाचं औचित्य साधून लाल बहादूर शास्त्री विद्यालयात क्रातिकारकांच्या प्रतिमेचेपूजन करुन क्रांतिदिन साजरा करण्यात आला.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदिप कुलकर्णी,प्रमूख पाहुणे बालाजी पडलवार उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले उपस्थित होते.बालाजी पडलवार यांनी क्रांतिदिनाचं महत्व विशद करुन त्याचं रुपांतर स्वातंत्र्यप्राप्तीत कसं झालं हे सांगितलं.तर प्रदिप कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यचळवळ जनमाणसांपर्यंत रुजली गेल्यामुळे आणि त्यातून क्रांतिच्या ज्वाला भडकल्या गेल्या.व त्याचे पडसाद सामान्यजनतेवर उमटले.त्यामुळे क्रांतिदिनाचं स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन केले..कार्यक्रमाचं प्रास्ताविक शंकरराव वाघमारे,सूत्रसंचालन आशा गौतम यांनी केले.वैयक्तिक गीत राजेश गौतम तर आभार श्रीपाद सन्मुखे यांनी मानले.शिल्पा सेलुकर यांनी गायलेल्या वंदे मातरम् गीतानी सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता यलमटे व शरद पवार निलेश मांडवकर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here