कोरोना काळातील खरेदी प्रक्रियेची चीकशी करावी
आ. निलंगेकरांची नियोजन समितीच्या बैठकीत मागणी
लातूर (प्रतिनिधी) :- कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत अनेक समस्यांना रुग्णासह सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागले होते. या काळात सर्ंसग आटो्नयात आणण्यासाठी आणि सर्ंसग झालेल्या रुग्णाच्या उपचार व इतर बाबीकरीता विविध साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली होती. ही खरेदी करण्यासाठी जो खर्च करण्यात आला याकरीता एका समितीचे गठन करण्यात आले होते. तरीही या खरेदी प्रक्रियेत अनियमितता निर्देशनास येत आहे. त्यामूळेच यामध्ये भ्रष्टाचार झाला असावा असा संशय व्यक्त करत या खरेदी प्रक्रियेची चौकशी करावी आणि या करीता नवीन समितीचे गठन करण्यात यावे अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही आ. निलंगेकर यांनी पत्राव्दारे मागणी केली आहे.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्हीसीच्या माध्यमातून आ. संभाजी पाटील निलंगेकर , आ. अभिमन्यू पवार आणि जि.प. अध्यक्ष राहूल केंद्रे सहभागी झालेले होते. या बैठकीत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील विकास कामासह शेतकरी हित, आरोग्य व शिक्षणासाठी भरीव निधीची तरतूद व्हावी याकडे पालकमंत्री देशमुख यांचे लक्ष वेधले. या बैठकीत बोलताना आ. निलंगेकर यांनी कोराना संसर्गाच्या दुसर्या लाटेत अनेक सेवाभावी संस्थासह सामाजिक व राजकीय संघटनानी वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णासह सर्वसामान्याना मदतीचा हात पुढे केला होता. याच काळात कोरोना संसर्ग आटो्नयात यावा याकरीता करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आणि कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाच्या उपचारासाठी वेगवेगळ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेली होती. या खरेदीसाठी होणार्या निधी विनियोगाकरीता एका समितीचे गठन करण्यात आलेले होते. मात्र या समितीच्या माध्यमातून या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असावा आणि त्यामुळेच या खरेदी प्रक्रियेत अनियमितता निर्देशनास येत आहे. या काळात झालेल्या खरेदीची तपशीलवार माहिती पाहिल्यानंतर काही साहित्याच्या खरेदी करीता दोन वेगवेगळे दर लावले आहेत. तर इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात जी खरेदी झालेली त्या करीता तपशीलात दिलेले दर अधिकचे असल्याचे दिसून येते. रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजण्यात येते मात्र रुग्णसेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
या खरेदी प्रक्रियेच्या चौकशीसाठी नवीन समिती नेमून या समितीला अहवाल देण्यास सांगावा अशी मागणी करत आ. निलंगेकर यांनी या खरेदी प्रक्रियेत ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला आहे. त्यांना सोडण्यात येवू असे सांगितले. या करीता लवकरात लवकर समिती नेमून याचा खुलासा करावा अशी मागणी आ. निलंगेकर यांनी केली असता यास सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री अमित देशमुख यांनी लवकर याची चौकशी करण्यात येईल असे आश्वासीत केले.