28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्याकॉंग्रेस सेवादलातर्फे सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांना अभिवादन

कॉंग्रेस सेवादलातर्फे सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांना अभिवादन

लातूर प्रतिनिधी-

कॉंग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक ०७ मे २०२२ रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल व जिल्हा काँग्रेस सेवादला तर्फे डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांना लातूरच्या काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले .

    यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप,  अॅड. देविदास बोरुळे पाटील, सेवादलाचे उपाध्यक्ष अॅड. सुनील गायकवाड, सेवादल मिडीयाचे प्रा. एम. पी. देशमुख, ब्लॉक अध्यक्ष भिमाशंकर झुंजारे , सरचिटणीस सपकाळ मामा, नितीन पुंड, यंग ब्रिगेडचे  सुर्योदय बोइनवाड, प्रशांत पवार  यांच्यासह कॉंग्रेस सेवादलाचे विविध पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

    याप्रसंगी डॉ.नारायण सुब्बाराव हार्डीकर यांच्या कार्याचा उजाळा मांडताना लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप म्हणाले कि, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेवादलाचे  योगदान हे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माहीत असावे. डॉ. नारायण सुब्राबाव हार्डीकर यांचा जन्म ७ मे १८८९ साली धारवाड कर्नाटक येथे झाला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचे ते  प्रमुख नेते होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांनी “हिंदुस्तान सेवादल” ची स्थापना केली होती. आज ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादल म्हणून ओळखली जाते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ. हार्डीकर हे  १९१३ साली  पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले तेथे मिशिगन युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध राष्ट्रीय नेते लाला लजपतराय हे त्यावेळेस अमेरिकेतच होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीने वातावरण तयार करण्यासाठी “हिंदुस्तान असोसिएशन ऑफ अमेरिका ” नावाची एक संस्था त्यावेळी तेथे काम करत होती. त्यामुळेच डॉ. नारायण सुब्बाराव हार्डिकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार घेऊन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायदेशी भारतात परतले. आणि कर्नाटकमधील तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेमाचे विचार रुजण्यासाठी १९२३ मध्ये हिंदुस्तान सेवा दलाची स्थापना केली. देशभर फिरून त्यांनी हिंदुस्तान सेवादलाचा विस्तार केला. हिंदुस्तान सेवादलाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील योगदान कधीच विसरणार नाही.

    अश्या थोर स्वातंत्र्यसैनिक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील  हिंदुस्तान सेवादल  म्हणजेच आजचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादल याचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांना आपण कायम स्मरणात ठेवूया आणि हे विचार प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी आणि  भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेवा दलाचे कार्य हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती करून द्यावी जेणेकरून हिच डॉ. नारायण सुब्बाराव हार्डीकर यांना खरी श्रद्धांजली असेल असे ते म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]