16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिक*केशवराज विद्यालयात संस्था वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा*

*केशवराज विद्यालयात संस्था वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा*


केशवराज’चा विद्यार्थी जीवनातील सर्व परीक्षांत  यशस्वी होतो – जगदीश कुलकर्णी

   लातूर/प्रतिनिधी:लातूर येथील श्री.केशवराज शैक्षणिक संकुलात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा  ७१ वा वर्धापन दिन  साजरा करण्यात आला.यानिमित्त संस्था ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.केशवराज संकुलात शिकणारे विद्यार्थी शैक्षणिकच नव्हे तर जीवनातील सर्व परीक्षात यशस्वी होतात,असे मत जगदीश कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

 सकाळी ७.२० वाजता संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ICT lab चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख,संजय गुरव,यशवंतराव देशपांडे तावशीकर,केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष मनोज शिरुरे,रेनिसन्स सीबीएससी स्कूलचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर,आस्था संकुलाचे प्रमुख उमेश गाडे ,श्री केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा.मनिषा टोपरे, रेनीसन्स सीबीएससी स्कूलच्या प्राचार्या आलिशा अग्रवाल,केशव शिशूवाटिकेच्या प्रधानाचार्या श्रीमती मंजुषा जोशी , विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल वसमतकर,केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.NTSपरीक्षेत यश संपादन करणारे विद्यार्थी,शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी,BTS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.    प्रमुख अतिथी तथा श्री.केशवराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी जगदीश कुलकर्णी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना संस्थेचे ‘केल्याने होत आहे रे ,आधी केलेची पाहिजे’, हे ब्रीदवाक्य आत्मसात करून आपल्या भावी आयुष्याची सुरुवात करावी असे आवाहन केले.केशवराज शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून विद्यार्थी केवळ शैक्षणिक पात्रतेत नव्हे तर जीवनाच्या सर्व परीक्षांमध्ये यशस्वी होतो,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

अध्यक्षीय समारोप करताना केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे भरभरून कौतुक केले.एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन निर्माण झालेली संस्था व ही संस्था निर्माण करणारे सर्व निर्माते यांचा नामोल्लेख करत व त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करून आपली एक नवीन परंपरा सुरू करावी असे मत व्यक्त केले.भगवद्गीगीतेतील योग सांगताना ‘तू जे जे कार्य करशील  ते ते संस्थेस समर्पित कर’ हा भाव प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांमध्ये निर्माण व्हावा,असे मत  व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनिल वसमतकर  यांनी केले.सूत्रसंचालन श्रीमती तेजस्विनी सांजेकर व श्री जितेंद्र जोशी यांनी तर आभार उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी मानले.कांचन तोडकर यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.   यावेळी माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]