लातूर ;
केव्हा, किती, कसं व काय खावं हे आरोग्यसाठी महत्वाचे असे उदगार अर्थवर्धिनी व श्री गुरूजी पतसंस्था वर्धापन दिन कार्यक्रमात आयुर्वेदाचार्य वैद्य माधवी निरगुडे यांनी काढले विषय होता ” देही आरोग्य नांदते ” यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाॅ.वृंदा कानडे व पतसंस्था अध्यक्षा अभियंता गीता ठोंबरे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
संस्थेचा हा आठवा वर्धापनदिन.मागील आठही वर्धापनदिनी पतसंस्थेने सामाजीक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर, कोविड काळापासुन कोविड बुस्टर डोस लसीकरण तसेच महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यावर्षी डाॅ.माधवी निरगुडे याचे व्याख्यान ऐकण्यासाठी जानाई फंक्शन हाॅल महिलांनी खचाखच भरला होता. पतसंस्था महिला सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मानसिक आरोग्य न सामाजीक आरोग्य याविषयावर विचार व्यक्त करत डाॅ.वृंदा कानडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. अर्थवर्धिनी पतसंस्था अध्यक्ष अभि गीता ठोंबरे यांनी प्रस्ताविक तर संचालिक मनिषा वैद्य यांनी आभार तर कार्यक्रमाचे सुत्र संचलन संचालिका रेखा मार्कंडेय यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संचालक मंडळाच्या सौ स्मिता अयाचित, रोहिणी मुंढे, अंजली कुलकर्णी, रूपा शिवणगीकर, रुपा देशपांडे, नीता खांडके ,अनुपमा पाटील व सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले…