आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरात धरणे आंदोलन; काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी
लातूर :
केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात लातूर शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करून भाजप सरकारचा जोरदार विरोध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशातील जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला सातत्याने प्रश्न विचारणारे, सर्वसामान्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणारे काँग्रेसचे नेते श्री. राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची ईडी मार्फत चौकशी केली जात आहे. केंद्र सरकारच्या या जाचक निर्णयाचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी (ता. १७) हे आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधी जी, हम आपके साथ हैं, राहुल गांधी जी, हम आपके साथ हैं... अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, जेव्हा जेव्हा देश संकटात होता, तेव्हा तेव्हा काँग्रेस लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी धावून आली आहे. आज महागाई, बेरोजगारी, देशाची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे भारत संकटात आहे. म्हणून काँग्रेस पक्ष आणि श्री. राहुल गांधी आवाज उठवत आहेत. रस्त्यावर उतरत आहेत. देशासमोरील खरे प्रश्न ते लोकांना सांगत आहेत. पण, कटकारस्थान करून, ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करून हा आवाज दाबण्याचे आणि लोकांचे लक्ष देशासमोरील खऱ्या प्रश्नांपासून बाजूला घेऊन जाण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
माजी आमदार श्री. वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, प्रमोद जाधव, रविंद्र काळे, सर्जेराव मोरे, विद्या पाटील, सपना किसवे, रमेश सूर्यवंशी, मारोती पांडे, अनंतराव देशमुख, सुरेश चव्हाण, नरेश पवार, इम्रान सय्यद, दगडूसाहेब पडीले, सचिन दाताळ, अनुप शेळके, सुधीर पोतदार, नारायण लोखंडे, प्रभाकर केंद्रे, बाबासाहेब गायकवाड, गोविंद पाटील, राजेसाहेब सवई, गोविंद बोराडे, प्रवीण सूर्यवंशी, सुभाष घोडके, अनिल पाटील, बादल शेख, कल्याण पाटील, अमोल भिसे, हणमंत पवार, मोहन सूरवसे, मतीन आली सय्यद, दत्तोपंत सूर्यवंशी, पांडुरंग वीर, कमलाकर अनंतवाड, बाळकृष्ण माने, ज्ञानोबा गवळे, विलास पाटील, दिनेश नवगिरे, इसरार सगरे सुतेज माने, विश्वास देशमुख, मधुकर शिंदे, विश्वनाथ कागले, प्रदीप काळे, सचिन इगे, चंद्रकांत धायगुडे, शंकर सगर, बालाजी मनदुमले, प्रदीप माळी, गुरूनाथ काळे, रामेश्वर हालके यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नगरसेवक, लातूर जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्ह्यातील आघाडी संघटना, विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.—(कोट)
खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकार आमच्या नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही. काँग्रेसने आपल्या भावना राज्यपालांपर्यंत पोचवल्या आहेत. केंद्र सरकारकडून होणारी दडपशाही थांबली नाही तर गावपातळीवर आंदोलने होतील.
– धिरज देशमुख, आमदार व सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी—