29 C
Pune
Wednesday, May 14, 2025
Homeराष्ट्रीय*केंद्र सरकारची "जलशक्ती अभियान" पथक लातूर दौऱ्यावर*

*केंद्र सरकारची “जलशक्ती अभियान” पथक लातूर दौऱ्यावर*

लातूर जिल्ह्यातील जल संवर्धनाचे काम चांगले ;पुढच्या कामाचेही प्रशासनाचे उत्तम नियोजन

  • राहूल मलिक, केंद्रीय नोडल अधिकारी, जलशक्ती अभियान

वृक्ष लागवड,जल संधारण आणि जल जागृती करणाऱ्या संस्थाचे केले कौतुक,अधिक व्यापक काम करण्याच्या दिल्या सूचना

लातूर दि. 8 ( जिमाका ):- लातूर जिल्ह्यात विविध विभागांनी जल संवर्धनाचे काम चांगले केले आहे, त्याला अधिक गती देऊन हे काम करावे. या जिल्ह्यातील भूमिगत पाणी पातळी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागतील, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पुढील कामाचेही उत्तम नियोजन केले आहे. काही शासकीय विभागांनी काही स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन वृक्ष लागवड, जल संवर्धनाचे उत्तम काम केले आहे तसे काम इतर विभागांनीही करावे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी राहुल मलिक यांनी केले आहे.

आज लातूर शहरातील आणि तालुक्यातील जल संवर्धनाची कामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत एस आर स्वामी, तांत्रिक अधिकारी,केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे होते. तसेच जिल्हा जलसंधारण अधिकारी ए एस कांबळे, कार्यकारी अभियंता, जि.प. बाळासाहेब शेलार, वरीष्ठ भूवैज्ञानिक गायकवाड, के आर नाबदे, उपअभियंता, जलसंधारण, दिलीप राऊत, तालूका कृषी अधिकारी उपस्थित होते.

   लातूर महानगरपालिकेत जाऊन या पथकाने शहरातील जल संवर्धनाबाबत महानगर पालिका कोणकोणते काम करत आहे, कोणते करणे अपेक्षित आहे याबाबत चर्चा केली. यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर यांनी माहिती दिली. त्यानंतर लातूर विभागीय वाहतूक परिवहन कार्यालयात पथक गेली, तेथील चौदा एकर क्षेत्रावर केलेली वृक्ष लागवड, वीस बाय दहा एवढे मोठे चार खडे करून त्याद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या कामाचे श्री. मलिक यांनी कौतुक केले. शहरातील रस्त्याच्या दुभाजकात लावलेल्या वृक्षाचे आणि त्याचे संगोपन करणाऱ्या ग्रीन लातूर पथकाचेही यावेळी त्यांनी कौतुक केले.

जलसंधारण कामाची केली पाहणी

लातूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाची पाहणी करतांना समतल चर, पाणी आडवून पाणी, ते पाणी मूरविणारे छोटे प्रकल्प यावेळी त्यांनी बघितले, बाभळगाव शिवारात झालेले जलसंधारण कामे, गावात असलेले शोष खड्डे, ग्रामसचिवालयाचे जल पुनर्भरणाची पाहणी केली. पुढे मुशीराबाद येथे झालेल्या कामाची पाहणी केली. गावकऱ्यांकडून जमिनीतील पाण्याची परिस्थिती जाणून घेतली. 500 मीटरवर एक गॅबियन बंधारा असे चार बंधारे असून हे काम अतिशय उत्तम झाल्यामुळे आमच्या शिवारातील पाणी पातळी यामुळे वाढेल असा विश्वास मुशीराबादच्या ग्रामस्थानी व्यक्त केला. खोपेगाव, गंगापूर येथील कामाचीही ते पाहणी करणार आहेत.

दरम्यान काल दि 7 जुलै रोजी जिल्हा जलशक्ती अभियान 2022 अंतर्गत विविध विभागांनी अभियानांतर्गत केलेल्या कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. अभियान कालावधीत विविध विभागांनी केलेल्या जलसंधारण कामांबाबत केंद्रीय पथकामार्फत समाधान व्यक्त करण्यात आले. अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेले ‘जल शक्ती केंद्र जल जागृतीकरीता ज्ञानाचे केंद्र बनावेत’ व त्यासाठी त्या केंद्राचे सबलीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नोडल अधिकारी, जलशक्ती अभियान,राहूल मलिक यांनी केले. यावेळी केंद्रीय पथकातील अन्य सदस्य श्री एस. आर. स्वामी, तांत्रीक अधिकारी,केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे यांनीही अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी करीता मार्गदर्शन केले. प्रारंभी पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अभिनव गोयल, यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]