उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रावत यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत
केंद्र शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचे आज लातूरात संमेलन
लातूर दि.२४– जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचे संमेलन, विकासतीर्थ रेल्वे बोगी प्रकल्पाची पाहणी आणि जेष्ठ नागरीक व बुध्दीवंताचे संमेलन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा. तिरथ सिंह रावत, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. विनोद गोटीया यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. २५ जून २०२३ रोजी लातूर येथे आयोजीत करण्यात आले आहे.
या संमेलनास उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंहरावत, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. विनोद गोटीया, जनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रविण दरेकर, अभियानाचे विभागीय क्लस्टर प्रमुख आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूर लोकसभेचे खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे जिल्हा प्रभारी प्रा. किरण पाटील, अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे समन्वयक विनायकराव पाटील, उदगीर विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सुधाकर भालेराव, लातूर लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे समन्वयक गुरूनाथ मगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून विविध योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे रविवार दि. २५ जून २०२३ रोजी केंद्र शासनाच्या घरकुल, उज्वला गॅस, शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत, मोफत राशन, कोरोना प्रतिबंधक लस, अटल पेंशन योजना, मुद्रा लोन, जनधन योजना यासह विविध योजनेतील लाभार्थ्यांचे संमेलन सायंकाळी ४ वाजता विश्व पॅलेस मंगल कार्यालय, डी मार्ट समोर रिंग रोड लातूर येथे तर सायंकाळी ६ वाजता केंद्र शासनाने ऐतिहासीक निर्णय घेवून लातूर येथे कार्यान्वीत केलेल्या विकासतीर्थ रेल्वे बोगी या महत्वकांक्षी प्रकल्पाची पाहणी करून सायं ७ वाजता गांधी मार्केट परिसरातील डॉ. भालचंद्र ब्लड बॅक सभागृहात जेष्ठ नागरीक व बुध्दीवंताचे संमेलन आयोजीत करण्यात आले आहे.
भाजपाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमास संबंधित लाभार्थी, जेष्ठ नागरीक, बुध्दीवंत यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, दिग्वीजय काथवटे, लातूर जिल्हा भाजपा जनसंपर्क अभियान संयोजक, सहसंयोजक यांनी केले आहे.