उदगीर ;(प्रतिनिधी)-
डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवासाठी परीक्षक म्हणून धनंजय गुडसूरकर यांची निवड झाली आहे.
१८0 महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या या केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन दि.१६ ते १९आॕक्टोबर या कालावधीत औरंगाबाद येथे विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे.सहा विभागात ३६ कलाप्रकारात सात रंगमंचावर विद्यार्थ्यांच्या कलेचा अविष्कार संपन्न होणार आहे.
या युवकमहोत्सवासाठी परीक्षक म्हणून गुडसूरकर यांची निवड झाल्याचे झाल्याचे कुलसचिव डॉ .भगवान साखळे यांनी कळवले आहे.
गुडसूरकर यांचा साहित्य ,कला व सांस्कृतिक उपक्रमातील वावर मोठा असून विविध उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य असून नाट्यकलावंत म्हणून त्यांनी कार्य केले आहे.केंद्रीय युवक महोत्सवासाठी परीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.