औसा: भारत सरकाराचे रसायने व खते राज्यमंत्री मा.श्री.भगवंत खुबा यांनी श्री नाथ संस्थान औसा येथे सदिच्छा भेट देऊन श्री नाथ मंदिरातील श्री स्वयंभू पांडुरंग व सद्गुरू समाधीचे दर्शन घेतले तसेच सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र सरकारचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार व सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना पुण्यश्लोक भिकुबाई मेनकुदळे स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
त्यानिमित्त श्री नाथ संस्थान औसाच्या वतिने शाल, श्रीफळ व श्री पांडुरंगाची मुर्ती देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला, त्यावेळी ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज औसेकर, श्री गोविंदराव माकणे, चाकूरचे नगराध्यक्ष श्री कपील माकणे व ईतर मान्यवर उपस्थित होते.