किल्लारी कारखान्यावरच माझ्या आमदारकीच्या मार्गाचे बीजकृंर – आ. अभिमन्यू पवार
किल्लारीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे प्रामाणिक पाठपुरावा करणार – आ. अभिमन्यू पवार
औसा – किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी औसा विधानसभा मतदारसंघातील १२४ ग्रामपंचायतीकडून आ. अभिमन्यू पवार यांना ठरावाव्दारे साकडे घालण्यात आले असून यावेळी झालेल्या बैठकीत किल्लारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी पाच वर्षांपासून शिष्टमंडळाची आपल्याकडे मागणी असून या शिष्टमंडळाच्या आग्रहखातीर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असताना किल्लारी कारखान्यावर गेलो होतो. तेंव्हा मी औशातून निवडणूक लढवावी अशी मागणी याच कारखान्यावर झाली.एकंदरीत आपल्या आमदारकीच्या मार्गाचे बीजाकृंर किल्लारी कारखान्यावरमुळेच झाला असून किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा निर्धार आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.
दि. २१ जुलै रोजी आ. अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील निवासस्थानी औसा विधानसभा मतदारसंघातील १२४ ग्रामपंचायतीच्या वतीने किल्लारी साखर कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने ठराव देण्यात आले.यावेळी झालेल्या बैठकीत किल्लारी कारखाना संघर्ष समितीचे प्रमुख गुंडाप्पा बिराजदार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, नगरपरिषदेचे गटनेते सुनील उटगे, किल्लारी साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, शरद भोसले, शेखर सोनवणे, जयपाल भोसले, ईनुस लदाफ, बालाजी जाधव, गोविंद भोसले, विलास सगर, काकासाहेब मोरे, संजय कुलकर्णी,दत्ता पाटील, बी. के. माने, शाहाजी सिरसले, युवराज पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, धनराज होळकुंदे, ओम बिराजदार, बळवंत पाटील, नितिन पाटील, ओम माने, परमेश्वर बिराजदार, जिलानी बागवान, प्रशांत येळनुरे, नारायण इंगळे, नागोराव राठोड, प्रमोद बिराजदार, भरत वेंजणे, बालाजी बिराजदार, सचिन आनसरवाडे आदी उपस्थित होते.किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण पाच वर्षांपासून प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी कुठेही अडकाठी निर्माण केली नाही. उलट विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आपण हा कारखाना सुरू करण्यासाठी माझ्या पध्दतीने मदतच केली आहे.
मी कारखाना सुरू करण्यासाठी जेवढे प्रयत्न केले. याउलट तेवढेच प्रयत्न हा कारखाना सुरू होवू यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी प्रयत्न केले.माझी बांधिलकी शेतकऱ्यांशी असल्याने शेतकरी हितासाठी आपण कधीही राजकारण केले नाही. किल्लारी कारखाना ४० कोटी देणे आहे. यामुळे बॅका किल्लारी सुरू करण्यासाठी मदत करायला तयार नाहीत. आशा परिस्थिती हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून. किल्लारी साखर कारखान्याकडून शिखर बॅंकेने आगाऊ वसुली केलेले ३० कोटी कारखान्याला परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून. यावर्षी चा गळीत हंगामात किल्लारी साखर कारखाना सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून औसा, निलंगा, उमरगा व लोहारा या चार तालुक्यातील २० हजाराहून अधिक सभासद संख्या असलेल्या व लातूर – उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या सीमेवर असलेल्या हा साखर कारखाना सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
_________________________
यावेळी बोलताना संघर्ष समितीचे प्रमुख गुंडाप्पा बिराजदार म्हणाले की यावर्षी हा कारखाना सुरू करण्यासाठी २० ते २५ कोटी लागणार आहेत. सदर लागणाऱ्या रक्कमेची तरतूद सरकार अथवा इतर बॅकेकडून आ. अभिमन्यू पवार यांनी करावी. कुठल्याही बॅंकेचे कर्ज मिळत नसल्याने हा कारखाना सुरू होत नाही.अनेक वर्षांपासून या बंद कारखान्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
…………….
हा कारखाना सुरू व्हावा म्हणून अनेकदा उंबरठे झिजवण्याचे काम आम्ही केले पण हा कारखाना आपल्या मालकीचा कसा होईल यासाठी काहीजणींनी प्रयत्न केला. हा कारखाना टिकला पाहिजे कारखाना उभारणीसाठी आम्ही स्वतः च्या जमिनी दिल्या म्हणूनच आमचा या कारखान्याशी जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे.या कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरातून शेतकऱ्यांच्या चुलीचा संबंध आहे. हि चुल कशा पेटतील याकडे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे शेतकरी अपेक्षेने पाहात असल्याचे यावेळी बोलताना किल्लारी चे माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील म्हणाले.