घोटाळा मुक्त महाराष्ट्र करणे हेच भाजपचे ध्येयं आहे
किरीट सोमय्या यांची लातुरातील पत्रकार परिषदेत माहिती
लातूर दि २८ (प्रतिनिधी ). महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोर अशी लुटारुआहे घोटाळे मुक्त महाराष्ट्र करणे हे भारतीय जनता पार्टीचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे अशी माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लातूर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
सोमय्या हे बुधवारी लातूर दौऱ्यावर आले होते .यावेळी त्यांनी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुक्तपणे संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील अर्धा डझन सहकारी साखर कारखाने लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. साखर कारखानदारीत सर्वात मोठा घोटाळा झाला असून 31 डिसेंबर 2021 अखेर या प्रकरणात काही जण जेलमध्ये असतील असा सनसनाटी आरोपहीत त्यांनी यावेळी बोलताना केला.
किरीट सोमय्या यांनी लातूरच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असलेल्या देशमुख कुटुंबीयांवर थेट हल्ला केला. या जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने गिळंकृत करण्याचा घोटाळा झाला आहे .याबाबत आपण लवकरच लातूर येथील स्थानिक पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन ईडीकडे जाणार आहोत अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली . लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या या घोटाळ्याप्रकरणी 31 डिसेंबर अखेर चौकशी होऊ शकते या चौकशीमध्ये काहीजण जेलमध्ये जाऊ शकतात असा इशाराही त्यांनी यावेळी दिला .
आपण आतापर्यंत 24 प्रकरणात घोटाळे उघडकीस आणले आहेत माझे टार्गेट चाळीस घोटाळे उघड करण्याचे आहे. मला महाराष्ट्र घोटाळे मुक्त करायचा आहे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले . त्यांनी महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने काही संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत त्या संस्था पैकी दोन संस्था लातूर जिल्ह्यातील आहेत त्याची चौकशी होईल या वेळी बोलताना स्पष्ट केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे या दरम्यान सत्ताधारी देशमुख कुटुंबीयांनी एखाद्या माफियाने बँक हडप करावी अशा पद्धतीची कृती या निवडणूक प्रक्रियेत करून विरोधकांचे सर्व उमेदवारी अर्ज फेटाळला आहे. याबाबत देखील आपण चौकशीची मागणी करणार आहोत असे त्यांनी सांगितले .लातूर जिल्ह्यातील सुमारे अर्धा डझन सहकारी साखर कारखाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा सर्वात मोठा घोटाळा आहे .जिल्हा बँकेसारख्या संस्थेने बंद संस्थांच्या संस्थांना कर्जपुरवठा करुन घोटाळे केले आहेत. या जिल्ह्यांमध्ये जागृती शुगर सारख्या खासगी कारखान्यांना जिल्हा बँकेने कर्ज दिले. आश्चर्य म्हणजे या कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे सर्व कर्ज टाकले सुमारे 11 हजार 500 सभासदांची फसवणूक करण्यात आली आहे या सारखे गंभीर आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केले
पत्रकार परिषद चालू होण्याअगोदर भाजपा नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश आप्पा कराड , आमदार अभिमन्यू पवार आदींनी लातूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने जिल्हा बँक मध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भातील निवेदनाची कागदपत्रे एकत्रितरित्या किरीट सोमय्या यांच्याकडे सुपूर्त करून लातूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यास वाचा फोडावी अशी मागणी केली .
या पत्रकार परिषदेस पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर , भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार , माजी मंत्री विनायकराव पाटील ,अरविंद पाटील निलंगेकर , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय थोरवे , गुरुनाथ मगे, प्रवीण कस्तुरे ,रामचंद्र तिरुके आदींची प्रमुख उपस्थिती होती