30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*किनवट येथील आदिवासी विद्यार्थ्यांना आयाबीचा आधार..*

*किनवट येथील आदिवासी विद्यार्थ्यांना आयाबीचा आधार..*


विद्यार्थिनींनी केला डॉक्टर बनण्याचा निर्धार..

नांदेड (प्रतिनीधी )-महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील, पूर्वेकडे असलेला सर्वात शेवटचा तालुका किनवट, आदिवासी बहुल असून आजही त्या परिसरात घनदाट जंगल आहे.निसर्गरम्य असलेल्या या तालुक्यात जगप्रसिद्ध असा सहस्त्रकुंड धबधबा येथे आहे.

या तालुक्यातील आदिवासी परिवारातील बारा मुलींना इयत्ता अकरावी आणि बारावीचे शिक्षण देणे आणि पीसीबी नीट परीक्षेचा दोन वर्षाचा संपूर्ण खर्च त्याबरोबरच त्यांच्या निवासाचा व जेवणाचा संपूर्ण खर्च तसेच त्यांना इतर लागणारा सर्व खर्च आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ने करण्याचे निश्चित केले आहे अशी माहिती आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांनी यावेळी दिली..

आजच्या वेगवान व महागाईच्या काळात अशाप्रकारे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक उत्तरदायित्व स्वीकारणे ही फार परिणामकारक आणि अभिमानास्पद बाब आहे.

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक संस्थेने जर असं कार्य केलं तर चांगल्या कार्याचा पर्वत उभा राहील हा आयआयबी ने घालून दिलेला आदर्श आहे .

आयआयबी चे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांनी टीम आयआयबीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून हे कार्य करण्याचे निश्चित केले आहे.

टीम आयआयबी आणि श्री दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात आयआयबीने संपूर्ण महाराष्ट्र काबीज करताना लातूर, नांदेड, कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, एफसी रोड पुणे व पिंपरी चिंचवड पुणे असा शाखा विस्तार करतेवेळी विविध सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले आहेत विद्यार्थी हेच केंद्रबिंदू व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच मुख्य हेतू ठेवत आयबीचे कार्य निरंतरपणे सुरू असून त्यांच्या या कार्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..

Uh un un

आयआयबी टीम करत आहे महिला सक्षमीकरण

आयआयबी या बाराही मुलींना आपल्या परिवारातल्या मुली म्हणून सांभाळणार आहेत. या मुली दोन वर्षे त्यांच्या देखरेखित राहणार आहेत कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सर्व विद्यार्थिनींना त्यांना आई-वडिलांची माया तर नक्कीच मिळेल परंतु त्यांचे करिअर घडेल आणि महिला सक्षमीकरणाचे मोलाचे कार्य टीम आयआयबीच्या माध्यमातून घडणार आहे याचा मनस्वी आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांनी यावेळी दिली…


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]