निलंगा तालुकाच नव्हे तरी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारे आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होय.
आज दिनांक 9 फेब्रुवारी. आदरणीय दादासाहेब यांची जयंती.
या जयंतीनिम्मित दादासाहेब यांच्या काही मोजक्या आठवणींना उजाळा देण्यचा छोटासा प्रयत्न करण्याचा योग आहे.
खरेतर दादासाहेब हे अत्यंत मन मिळाऊ स्वभावाचे व दूरदृष्टी विचार करणारे नेते होय.
दादासाहेब यांनी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची जान होती. एखादा कार्यकर्ता बऱ्याच दिवसांनी भेटला तरी त्याना आवर्जून विचारपूस करत असे. ते म्हण्याचे कुठे आहेस? एवढे दिवस कुटे होतास? तुला बर वाटत नव्हता का? घरी आई वडील बरे आहेत का? तू काय करतोस? शेती पाणी बर आहे का?तुझा भाऊ नौकरी करतो का? अशे घरगुती प्रपंच व्यवहार इत्यादी बाबी ते सतत विचारपूस करीत असतं. यामुळे कार्यकर्त्यांना बळ व ताकत मिळत असे.
दादासाहेबांचा एक स्वभाव असा होता कि वरिष्ठ नेत्यापासून ते वरिष्ठ अधिकार व्यक्ती किंवा एखादा गरीब कार्यकर्ता असो सर्वांनाच समान वागणूक देऊन सर्वांचा मान सन्मान करीत असतं. एकदा खडक उमरगा येथील साहेबांची कार्यकर्ती गयाबाई अत्यंत गरीब व दादासाहेबांची कट्टर विचाराची ती महिला सतत साहेबांना भेटायला यायची. साहेब तिला आपल्या सोबत बरोबर घेऊन तिची असतेंव्याईकपणे विचारपूस करीत व तिला चहा पाणी जेवण करून पाठवत असे.
बाहेरच्या गावातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना जेवण केल्या शिवाय परत पाठवणार नाहीत.
साहेबांच्या सत्तेच्या काळात अधिकारी लोकांना विशेष आपुलकीची वागणूक देऊन त्यांना सन्मान देत असतं.
खरेतर आज बरेच अधिकारी सेवानिवृत्त झाले असले तरी ते आज पण साहेबांचा आदर करून आठवण काढतात.
निलंगेकर साहेब देव माणूस होते. त्या देव माणसाबद्दल माझा अनुभव कथन करीत आहे. तसें मी दादासाहेबांवर जिवापाड प्रेम करतो व ते आज पण जपत आहे.
दोन वर्षांपूर्वी माझी प्रकृती अचानक खालवली, मी पोटाच्या आजारामुळे घरीच अराम करत होतो. तसा माझा स्वभाव कि निलंग्यामध्ये दादासाहेब असताना सकाळ दुपार संध्याकाळी भेटत असे परंतु चार पाच दिवस आजारी असल्यामुळे त्यांच्याकडे मला जाणे झाले नाही आणि कुणीतरी साहेबांना सांगितले कि दयानंद आजारी आहे, हे कळताच क्षणाचा ही विलंब न करता ते सरळ माझ्या घरी सकाळी 9 वाजता आले.
आदरणीय आईसाहेब मन्हत होत्या, तो एवढ्या लवकर उठत नाही. दादासाहेब म्हणाले मी त्याला उठवतो त्याची विचारपूस करतो. असे म्हणत ते माधव माळी यांना घेऊन माझ्या घरी आले. मी विचारात पडलो साहेब… ते पण माझ्या गरीबाच्या घरी.. मी भांभाऊन गेलो?? माझा आनंद गगनात मावेना..
आणि खरंच माझा अर्ध्या पेक्षा आजार बरा झाला.
साहेबांनी माझी विचारपूस करून, माझ्या सहवासात पूर्ण चार तास घालवले. माझ्या गरीबाच्या घरामध्ये जेवण केले आणि म्हणाले लवकर बरा हो पुन्हा आपल्यला बरेच कामे करायचे आहेत. मी धन्य झालो आणि बरा पण झालो व पुन्हा साहेबांच्या सेवेत सहभागी झालो. हे करीत असताना साहेब दोन वर्षांनी मला सोडून गेले.
आज ही मला वाटते, साहेब अजून कुठतरी दिल्ली, मुंबई ला गेले आहेत ते परत येतील अशी माझी भोळी भाबडी अशा आहे.
आजच्या जयंती दिनानिम्मित मी आदरणीय दादासाहेबांना नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करून अपेक्षा करतो साहेब मुंबईहून परत येतील.
आपलाच कार्यकर्ता!!!!
प्रा.दयानंद चोपणे.