लातूर – भारतीय संस्कृतीत तथा गायीला कामधेनु, सुरभी, गौमाता म्हटले जाते भगवान श्री कृष्णाला गायी फार प्रिय होत्या गायीवर त्यांचे नितांत प्रेम होते म्हणून भ.श्री कृष्णाला ‘गोपालकृष्ण’ असेही संबोधिले जाते. धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आर्थिक दृष्टि या गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे. गायीचे दूध अमृततुल्य मानले गेले आहे. तल्लख बुद्धि आणी निरोगी काया साठी गायीचे दूध महत्वाचे मानले गेले आहे. गोमुत्राने अनेकअसाध्य आजार, जुन्या व्याधी दुरुस्त होतात. गायीची शेण हे सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे म्हणून म्हटले जाते ‘गोत्रये वसते लक्ष्मी’ एकंदरीत व्यक्तीच्या जीवनात गायीचे अनंत अनंत उपकार आहे.

अशा या परोपकारी गायीचे संगोपन व संरक्षण व्हावे या हेतूने श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघाच्या वतीने जैन साध्वी पुंडीतरला पू. प्रभाकरजी म. सा. पू.प्रकाशकंवर म.सा. यांच्या प्रेरणेने लातूर येथील अंबाजोगाई रोडवर श्री गुरु गणेश जीवराज जैन गोरक्षण सुरू केले गोसेवेला ईश्वरील कार्य मानून जीवदयेच्या या पवित्र कार्याला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात भौतिक सुविधा, पैसा उभा करणे पाण्याची, गोठ्याची व्यवस्था करणे अशी अनेक आव्हाने होती परंतु ‘कार्य कठीण है, किंतु करणे योग्य आहे’ हे ध्येय उराशी बाळगून गोसेवा वे कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले व अल्पवधीतच लोकांनी सहभाग वाढवून गोसेवेचे कार्याला गती दिली जैन, जैनेतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान दिले व त्यातून गोठे, पाणी, विद्युत, इत्यादी सुविधा गायीसाठी करण्यात आल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढविला वाढदिवस, वडिलांचे पुण्यतिथी, विवाह दिन निमित्त गोभक्त गोग्रास साठी आपले योगदान देऊ लागले वर्तमानपत्राने ही गोसेवेच्या पवित्र कार्याची दखल घेतली व या कार्याला प्रसिद्धी दिली.
सन 2019 मध्ये या गोरक्षणमध्ये ‘कामधेनू देवालय’ (सप्तपदी गोमाता मंदिर) ची ह.भ.प.पू गहिनीनाथ महाराज औसेकर व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापणा करण्यात आली. जयपूरहून श्रीकृष्णची गायीवर वरील विराजमान असलेली सुंदर व सुबक पांढरी मूर्ती आणण्यात आली कामधेनु देवालय च्या परिक्रमेत विविध रंगाच्या सात गायी विराजमान असून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. हे देवालय वास्तुशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे देवालया समोर व परिसरात बगीच्या करण्यात आला आहे. आला असून देवालयांची सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. भाविकांनी व विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे ठेवण्यात आले आहे एकादशी, अमावस्या, पौर्णिमा व प्रसंगी संध्याकाळी 05 ते 07 भजनी मंडळात द्वारे भजन संध्या चे आयोजन केले जाते ज्याचा आनंद आबालवृद्ध घेत असतात दररोज संध्याकाळी 6.45 वाजता भ. कृष्ण व गोमातेची आरती होते अमावस्या उपक्रमात सर्व गायींना संध्याकाळी पुरणपोळीचा मेजवानी असते. तर पोर्णिमेला सर्व गायींना लापशीचे लडू भरवले जाते मनोकामना पूर्ण करणारी कपिला गाय देवालयचे प्रमुख वैशिष्ट्य आहे अनेक गोभक्तांनी याची प्रचिती आल्याचे सांगितले आहे. कामधेनु देवालयात अनेक साधू-साध्वी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी भेट होऊन येथील कार्याचे मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. मुक्त विहिरीतील जवळपास 300 गायी भ. कृष्णची मूर्ति, मंदिराची आरास, आकर्षक विद्युत रोषणाईत नयणरम्य बगीच्या येणाऱ्या गोभक्त व भाविकांचे लक्ष वेधून घेते. सहलीच्या माध्यमातून अनेक शाळा विद्यार्थींना या ठिकाणी घेऊन येतात अमावस्याला तर गर्दीच गर्दी असते असे हे सुंदर मनमोहक कामधेनू देवालय आजही गुढीपाडव्याला चतुर्थ वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे लातूरच्या वैभवशाली परंपरेला साजेस हे कामधेनु देवालय भाविकांच्या श्रद्धास्थान झाले आहे. चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त कामधेनु देवालय व कार्यकर्त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सुंदर व आकर्षक मंदिराला व गोशाळेला लातूरकरांनी अवश्य भेट द्यावी ही विनंती

राजेश भा. डूंगरवाल , लातूर
mo 9421364462