कव्हेकर यांचे मत

0
242

 

मोदीच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता बनेल

– माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर दि.30-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग अत्यंत चांगल्याप्रकारे केले आहे. ज्यामध्ये कृषीला कर्जत अवस्था आणण्यासाठी नवीन कृषी कायदे, इंग्रजकालीन शिक्षणामध्ये बदल करण्यासाठी सीबीसीएस शिक्षणपध्दती, उद्योगासाठी विविध योजना युवकांना आधार देण्यासाठी मुद्रा योजना, सर्व देशासाठी समान टॅक्स पध्दत जगातील सर्व देशाशी सलोख्याचे संबंध आहेत यामुळे या कोव्हिड संकटावरती मात करून भारत देश सन 2021-22 मध्ये जीडीपी 11.5 टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नानेनिधीने (आय.एम.एफ) यांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे भविष्यात मोदीच्या नेतृत्त्वाखाली देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते तथा एम.एन.एस.बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी आर.बी.आय.चे सेवानिवृत्त अधिकारी के.सी.मिश्रा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभातार्ई पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे तज्ज्ञ संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर,डॉ.उटगे, बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, संचालक सुर्यकांतराव शेळके, संचालक रविंद्र कांबळे, महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अमरदिप जाधव, जॉईंट एम.डी.बाळासाहेब मोहिते, बाबासाहेब देशमुख, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी या प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी झालेल्या मराठवाड्यातील अनेक बँकांच्या प्रतिनिधींनी सहभागाचे प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये नागरी बँकाचा सिंहाचा वाटा

भारत देशामध्ये सहकार चळवळीची सुरूवात छत्रपती शाहु महाराजांनी कोल्हापुर येथून केली. त्यानंतर वैंकुटभाई मेहता, बॅ.गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व सध्या शरदराव पवार यांनी केली आहे. नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, प्रक्रिया उद्योग व विविध सहकारी संस्था सुरूवात करून त्या माध्यमातून महाराष्ट्रासहीत अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांगिण विकास नागरी सहकारी बँका व सहकारी चळवळीमुळे देशात झाला असल्याचे मतही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.

राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे नागरी बँकांना योजना द्यावा

देशामध्ये नागरी बँकाचा व्यवहार राष्ट्रीयकृत बँकापेक्षा चांगला आहे. काही बँकाचा अपवाद सोडता नागरी बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम राहुन सामान्य नागरिकांना त्याच्या अडचणीत मदत करणार्‍या आहेत. त्यामुळे केंद्रिय लघु उद्योगाच्या स्वयंपुर्ती योजना व राज्याच्या विविध योजना आहेत. त्या राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे नागरी सहकारी बँकांना द्याव्यात, अशी लेखी मागणी आपण लघु उद्योग मंत्री ना.नारायणराव राणे व मुख्यमंत्री यांना केली आहे.

आरबीआय मार्फत नागरी बँकावर गैरविश्‍वास दाखवून त्यावर अनेक जाचक अटी लावल्या जात आहेत. त्या कमी करून व आवश्यक तेवढा बदल करून केला जावा, असे अभ्यासपूर्ण विचार एम.एन.एस.बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here