दिनविशेष
अंतराळवीर कल्पना चावला यांचा आज स्मृतिदिन.
कल्पना चावला या पहिल्या भारतीय अमेरिकन
अंतराळवीर होत्या. अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला म्हणून कल्पना चावला यांचे नाव समोर येते. त्या विमान प्रशिक्षक होत्या. त्यांनी जवळपास १ कोटी मैल अंतराळ यात्रा केलेली आहे तसेच ३७२ तास अंतराळात
राहण्याच्या विक्रमही केलेला आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत दोन वेळा अंतराळ प्रवास केला होता.
त्यांच्या योगदानामुळे त्यांना नासा विशिष्ट सेवा पदक
काँग्रेशनल अंतराळ पदक, नासा अंतराळ उड्डाण पदक अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
विनम्र अभिवादन!