देवणी पंचायत समिती अधिकारी व कर्मचा-यांच्या निवासस्थानास मंजुरी
आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुरव्याने १३ कोटी निधी
लातूर/प्रतिनिधी: निलंगा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या देवणी येथे पंचायत समितीची नुतन व सुसज्ज इमारत तयार झालेली आहे. मात्र पंचायत अधिकारी व कर्मचा-यांसाठी निवासस्थान नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेवूनच आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी देवणी अधिकारी व कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठी प्रशासकीय मान्यता देवून निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केलेली होती. त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा केल्यानंतर यास प्रशासकीय मान्यता मिळालेली असुन १३ कोटी ३ लाख रूपयेच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेले देवणी हे शहर निलंगा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येते. या शहरात आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीची नुतन व सुसज्ज इमारत उभारली गेलेली आहे. मात्र पंचायत समिती अधिकारी व कर्मचा-यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आलेली नव्हती. अधिकारी व कर्मचा-यांची निवासस्थाने नसल्यामुळे मोठी गैरसोय होत होती. परिणामी नागरिकांची कामेही रखडली जात होती. ही बाब लक्षात घेवून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवासस्थान बांधण्यास मंजुरी देवून त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेली होती. यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा ही आ.निलंगेकर यांनी केलेला होता. या पाठपुराव्यास यश आलेले असुन निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळत १३ कोटी ३ लाख ११ हजार रूपयांच्या निधी उपलब्ध होणार आहे.
देवणी पंचायत समिती अधिकारी व कर्मचा-यांसाठी आता एकुण २६ निवासस्थाने या निधीच्या माध्यमातून उभारली जाणार आहेत. यामध्ये टाईप एक प्रकारची ४, टाईप २ प्रकाराची १६, टाईप ३ प्रकाराची ४ तर टाईप ४ प्रकाराची २ निवासस्थाने उभारली जाणार आहेत. लवकरच या निवासस्थानाच्या बांधकामास सुरूवात होणार असल्याची माहिती आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेली आहे. पंचायत समिती अधिकारी व कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठी मंजुरी मिळणेकरीता आवश्यक असणारा पाठपुरावा आ.निलंगेकर यांनी केल्याबददल त्यांचे अधिकारी कर्मचा-यासह देवणी ग्रामस्थांनाकडुन आभार व्यक्त करण्यात येत आहेत.