भारत विकास परिषदेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
लातूर :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषदेच्या वतीने मंगळवार, दि. ८ मार्च रोजी चार वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनिय योगदान देणाऱ्या अन्नपूर्णा लादे, वैशाली चापसी, डॉ. मोनिका पाटील आणि रेणुका जाधव या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

शहरातील प्रमोद गॅस एजन्सी च्या सभागृहात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ऋतुजा आयचित होत्या. यावेळी योगिता पत्की, संध्या काळे, श्वेता आयचित, संपदा दाते, दिक्षा दगडगावे, विदुला लातूरकर, वृषाली जोशी, मृणाल कुलकर्णी, कविता दंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने मागील जवळपास ६ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य, पर्यावरण, जनजागृती अशा विविध घटकांवर परिषद ही वर्षभर नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम राबवित असते. दरम्यान, ८ मार्च
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषदेच्या वतीने चार वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनिय योगदान देणाऱ्या अन्नपूर्णा लादे, वैशाली चापसी, डॉ. मोनिका पाटील आणि रेणुका जाधव या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मागील तब्बल २२ वर्षांपासून स्वयंपाकघरातील व्यवस्थापन पाहणाऱ्या अन्नपूर्णा लादे, पर्यावरण जनजागृतीमध्ये करणाऱ्या वैशाली चापसी, वैद्यकीय क्षेत्रातील योगदान डॉ. मोनिका पाटील आणि पोलीस अधिकारी म्हणून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक रेणुका जाधव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.