लातूर जिल्ह्यातील औसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया सुरू असून या प्रवेश प्रक्रियेदरम्यान संस्थेमध्ये खालील प्रकारच्या व्यवसायिक शिक्षण प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार असून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

१. वीजतंत्री – २० जागा
२. तारतंत्री – २० जागा
३. डिझेल मेकॅनिक – ४८ जागा
४. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २४ जागा
५. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक- २० जागा
६. ड्रेस मेकिंग – २० जागा

संस्थेची ठळक वैशिष्ट्ये :-
•अद्यावत व सुसज्ज अशी इमारत
•आधुनिक मशीनसह अद्यावत कार्यशाळा
•कॅम्पस इंटरव्ह्यूची सुविधा उपलब्ध
•व्यक्तिमत्व विकासासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन
•गुणवत्ता विकासासाठी विशेष प्रयत्न
•सुसज्ज संगणक कक्ष व संपूर्ण परिसर वायफाय व्याप्त
•इंटरनेटची सुविधा उपलब्ध
•आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा

•तज्ञ असा शिक्षक वर्ग.
तालुक्यातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी उपलब्ध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावा यासाठी www.admission.dvet.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा असे आवाहन प्राचार्या रणभीडकर यांनी केले आहे.