औशाचा राहुल देशपांडे यांचा भक्तीसंध्या कार्यक्रम रद्द
आ. अभिमन्यू पवार यांची माहिती..
औसा – नववर्षाच्या स्वागतानिम्मत्त १ जानेवारी रोजी औसा येथे नियोजित जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांचा भक्तीसंध्या कार्यक्रम कोव्हीडच्या नवीन नियमावली आल्याने पुढे ढकलण्यात आला आहे.याबाबतची अधिकृत माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
नववर्षाची सुरवात भक्तीसंगीताच्या हर्षोल्हासात व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने दि.१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता उटगे मैदान उंबडगा रोड औसा याठिकाणी जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांचा भक्तीसंध्या हा कार्यक्रम होणार होता. मात्र कोव्हीडच्या नवीन नियमावलीमुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.या कार्यक्रमाची पुर्ण तयारी झाली होती. मात्र राज्य शासन व लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या कोव्हीडच्या नवीन नियमावलीमुळे तूर्तास हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.लवकरच या नियमात शिथिलता आल्यानंतर हा कार्यक्रम नव्याने केला जाणार असल्याची माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी दिली आहे…