39.4 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeकृषी*औराद 44 अंशाचा पारा:सूर्य आग ओकतोय..*

*औराद 44 अंशाचा पारा:सूर्य आग ओकतोय..*


लातूरकरांनो,सावधान! लातूर होरपळीच्या उंबरठ्यावर

लातूर/प्रतिनिधी
काल परवा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद औराद शहाजानी येथे 44 अंशाची झाली आणि खाडकन डोळे उघडले,सूर्य मागच्याआठ दिवसापासूनआगओकतोय त्यामुळेलातूरकरांनो,सावधान! लातूर होरपळीच्या उंबरठ्यावर उभे आहे अशी हाक काल शेतकरी नेते पाशा पटेल यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या वाढदिवसानिमित्त दिली आणि त्यांनी सांगितलेल्या घटना ऐकून उपस्थित आवाक झाले..

कुठलेही हार नको,बुके नको,शाल आणि श्रीफळ नको,माझी ही हाक आपण ऐकावी आणि विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या लातूरला आतातरी आपण जाणकारांनी वाचवावे अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली..लोदगा येथील माळरानावर उभारलेल्या बांबू संशोधनाच्या भव्यदिव्य संशोधन केंद्रासमोर हा कार्यक्रम पार पडला..


याप्रसंगी नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्री लिमिटेडचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे,कीर्ती उद्योग समूहाचे प्रमुख अशोक भुतडा,उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित होते…

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना बी.बी.ठोंबरे म्हणाले की काळाची पावले ओळखून आपण यात उतरायला हवे,बांबू उद्योग नुसता करून भागणार नाही,त्यासाठी बांबू उत्पादन सुरुवातीला वाढवावे लागेल..हे उत्पादन वाढले तर एखादा कारखाना जिल्ह्यात उभारण्याचा मानस नॅचरल शुगरचा असेल असेही त्यांनी सांगितले..
पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले की,महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त तापमान औराद शहाजानीला दाखवले म्हणजे मरण आपल्या दारात आले आहे..भारत सरकार आपल्याला 20% greenary करा असे सांगत आहे,याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा..यासाठी झाडे कुठली लावायची,अति शीघ्र गतीने वाढणारे आणि बहुउपयोगी झाड आपल्याला लावणे गरजेचे आहे,ते झाड म्हणजे बांबू आहे..हे झाड एका दिवसांमध्ये 1 ते 2 फूट वाढत जाते..यापासून इथेनॉल,थर्मलला लागणारा कोळसा बनतो,तांदूळ,लोणचे,मुरब्बा जीवनावश्यक वस्तू ब्रशपासून ते खुर्ची,कार्पेट सगळ्या वस्तू आणि कपडेही बनवले जातात..अन्न, वस्त्र,निवारा,ऑक्सिजन,कार्बन देते म्हणून पर्यावरणपूरक झाड म्हणून बांबू आलेला आहे..2030 नंतर 100 दिवस पडणारा पाऊस ऋतुमान बदलामुळे 52 तासात येऊन जाणार आहे.त्यालाही अपवाद ठरला असून तुतीकोरिन येथे एक दिवसात सुमारे 960 मिमी  पावसाची नोंद झालेली आहे..म्हणजे दीड वर्षात पडणारा पाऊस एक दिवसात पडला आहे..म्हणजे आयपीसीसीच्या रेपोर्टच्या पुढे सुद्धा हा खेळ पुढे गेलाय आणि मरण आता आपल्या दारात येऊन ठेपलेले आहे..एक दिवसात गावावर किंवा शहरावर सव्वा फूट पाऊस पडला तर आपण जगणार आहोत का?या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करायला हवे..दुबईत परवा पडलेला पाऊस त्याचेच लक्षण आहे,तिथे वर्षाला 70 मीमी पाऊस पडतो तिथे एक दिवसात 170 मिमी पाऊस पडला..दुबई वाहून जायची वेळ आली,तेच पाऊस लिबिया नावाच्या देशातील डेरणा नावाच्या शहरात 18 महिन्याचे पाऊस एक दिवसात पडले,शहर वाहून गेले..40 हजार लोक मृत्युमुखी पडले,त्या शहराला जगाला आव्हान करावे लागले की आम्हाला मृतदेह ठेवायला प्लास्टिक पिशव्यांची मदत करावी,कारण ते मुस्लिम राष्ट्र आहे तिथे जाळत नाही मृतदेह पुरावे लागतात..त्यामुळे तापमानाच्या या अश्या बदलांमुळे पाऊस,थंडी,मृत्यू याचे प्रमाण वाढत जाणार आणि 2050 नंतर पृथ्वीवर मानवजात नष्ट होण्याच्या खेळाला आता सुरुवात झाली आहे,त्यामुळे काळाची पावले ओळखून आपण सगळेजण नव्या प्रवाहाकडे वळावे लागणार आहे..नवनवीन विषय सोबत घेऊन हा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कसा थांबवता येईल याचा विचार करावा लागणार आहे..


युनोने सांगितले आहे की आता तापमान वाढीचे युग संपले आहे,होरपळीच्या युगाला आपण सुरुवात केलेली आहे..आता तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे,तातडीने मानवजात वाचवण्यासाठी जे करता येईल त्यामध्ये वृक्ष लागवड आणि अन्नधान्यात फेरबदल करणे गरजेचे आहे..आता ऋतुचक्र संपले आहे,पावसाळा,उन्हाळा,हिवाळा आता कधीही पाऊस,कधीही थंडी आणि कधीही उन्ह सुरू झाल्याने,आपल्याला त्याच्या सवडीनुसार बदल करावे लागणार आहेत..अश्या परिस्थिती शेतात काय पेरावे,डायबेटिकस,कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करणारे अन्नधान्य आता आपल्याला पेरावे लागणार आहेत..सुपरफूड बनवावे लागणार आहे,हे धान्य फक्त आपल्या जिल्ह्यात पिकवले जाते,आपण भाग्यवान आहोत,देशाला सुपरफूड देण्याची ताकद आपल्या जिल्ह्यात आहे..कमी पाण्यात,कमी खर्चात,कमी दिवसात येणारी पिके राळा,वरई,हुलगा ही पिके आपल्याला घ्यावी लागणार आहेत..40 वर्षाखाली जी पिके आपण खात नव्हतो ते आता सुपर फूड म्हणून बाजारात येत आहेत आणि देश अश्या फूडच्या मागे लागत आहे,आपल्याला याचा विचार करून एका बाजूला बांबूची झाडे आणि सुपरफूडसाठी प्रयत्न करावे लागतील..देशाला अन्नधान्य देणारा जिल्हा म्हणून याची ओळख तयार करावी लागेल,
मित्रहो,विनाशापासून वाचायचे असेल,आपल्या नाही तर आपल्या नातवाना हे जग पाहू द्यायचे असेल तर आपले डोळे उघडे ठेवा आणि विनाश उंबरठ्यावर आलाय हे लक्षात घेऊन आपण काळाची पावले ओळखून प्रत्येक शेतकऱ्याने बांबूसह सुपरफूड (मिलेट)निर्मितीमध्ये उतरायला हवे,फिनिक्स फाउंडेशन संस्था यापुढील काळात आपल्या गावात येईल आपण ऐकून घेऊन आपला निर्णय बदलाच्या प्रक्रियेसोबत राहणे गरजेचे आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]