औसा : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून औसा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्य समन्वयक मकरंद जाधव यांनी प्रशिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना योगाचे प्रशिक्षण दिले.
यासोबतच नियमितपणे योगा केल्याने मानवी शरीरावर होणारे लाभदायक परिणाम याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या YES कोर्स व YLTP कोर्स याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या योग शिबिराच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कुमारी रणभिडकर आय.टी. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अजय वाघमारे, पाटील एस आर, जाधव पी एच, सौ. कलाने सी एस, सौ.खानापुरे एम बी, ए बी भोसले, चौरे एस के, सादिक मुल्ला, नाईकवाडी जे ए, दीक्षित महेश, सगर एन आर यांच्यासह संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.