महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आ. रमेशअप्पा कराड यांच्याकडून आभार
लातूर दि.२०– ठाकरे सरकारच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणा मुळे घालविलेले ओबीसी समाजाचे हक्काचे राजकीय आरक्षण राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ओबीसी समाज बांधवाच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी आभार मानले.
ओबीसी समाजाला महाराष्ट्र राज्यात राजकीय आरक्षण होते मात्र समाजाची बाजू उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने न्यायालयात व्यवस्थीतपणे बाजू मांडण्यात आली नसल्याने ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण रद्द झाले. सरदरील आरक्षण परत मिळावे यासाठी समाज बांधवाच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी रास्ता रोको, जेलभरो, चक्काजाम आंदोलने केली तरीही सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या वतीने न्यायालयात ठोस भूमिका न घेता वेळकाढू पणाची भुमीका सतत घेतली. केवळ महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला नव्हता असे आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले.

राज्यातील सत्ताबदलानंतर दुस-याच दिवशी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका होणार नाहीत असा शब्द दिला होता. त्यानुसार सरकारच्या बाजूने न्यायालयात कशा पध्दतीने सक्षमपणे बाजू मांडण्यात येईल या अनुषंगाने संबंधीताची बैठक घेवून सुचना केल्या. त्यामुळेच बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत माजी मुख्य सचिव जयंतकुमार बाटीया आयोगानुसार ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचे आणि त्यानुसार निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करून हा निर्णय समस्त ओबीसी समाज बांधवाच्या संघर्षाचा विजय आहे. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया देवून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार जावून राज्यात माहयुतीचे सरकार सत्तेवर यावे लागले.
महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे रद्द झालेले हक्काचे ओबीसी समाजाचे आरक्षण मिळवून दिल्याबद्दल महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे समस्त ओबीसी समाज बांधवांच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी आभार मानले.