लातूर ; दि. २४ ( प्रतिनिधी) -ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवून समस्त ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच देवेंद्रजीनी आपला शब्द पाळल्या बद्दल लातूर मध्ये त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवाजी गडदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा शहर जिल्हा प्रभारी शिवसिंह सिसोदिया, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, मंडळ अध्यक्ष रवी सुडे , ओबीसी सरचिटणीस महादेव कानगुले , मंडळ अध्यक्ष सचिन मदने ,विजय जगताप, चंदू क्षीरसागर ,नगरसेवक अजय दुडिले , भाजपा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी ,प्रवीण सावंत , दिग्विजय काथवटे, मंडळ अध्यक्ष ज्योतिराम चिवडे , ललित तोष्णीवाल , संतोष ठाकूर ,संजय गिरी ,अल्पसंख्याक सेलचे मुन्ना हाशमी आदी उपस्थित होते.