ऑस्किजन प्रकल्पास मदत

0
217

*ऑक्सिजन प्रकल्पात* 

*अभिजातीयन्स् चा खारीचा वाटा*

     ‘स्पंदन’ या स्वंयसेवी संस्थेतर्फे लातुरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होत असून लातुरकरांच्या उत्स्फूर्त मदतीतून तो उभा राहतो आहे. लातुरकरांनी लातुरकरांसाठी सुरू केलेला हा प्रकल्प आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचा अतिशय तुटवडा झाला होता. त्यामुळे अनेकांना आपले आप्तस्वकीय गमवावे लागले. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून काही द्रष्ट्या लोकांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभा राहतो आहे.

या प्रकल्पाला अभिजातीयन्स् नी सुध्दा खारीचा वाटा उचलत आर्थिक मदत केली. ही मदत प्रत्येकाने वैयक्तिकरित्या केली. परवा आम्ही पाच जणांनी तो चेक प्रकल्पाचे एक प्रमुख डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्याकडे दिला, तेव्हाचे हे छायाचित्र!

यात सर्वश्री जितेंद्र पाटील, विश्वास शेंबेकर, डॉ. स्वप्नील देशमुख, ज्ञानेश्वर चौधरी, धनंजय कुलकर्णी, अभिषेक बुचके, संतोष कुलकर्णी, शिवशंकर पटवारी, अभिजीत भूमकर व मी अशी मदत झाली. सर्वांचे आभार!

आपल्या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा विनंती, अजूनही त्यांना अपेक्षित असलेली रक्कम जमलेली नाही. अद्याप मदत घेणे सुरू आहे. ज्यांना मदत करायची ईच्छा आहे, त्यांनी संबंधितांकडे करावी, असे आवाहन यानिमित्ताने आम्ही करीत आहोत. धन्यवाद!

*टीम अभिजात*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here