30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसांस्कृतिक*ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5 हिकरणी तर्फे आयोजित “आमने सामने” नाट्यप्रयोगास प्रेक्षकांतून...

*ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5 हिकरणी तर्फे आयोजित “आमने सामने” नाट्यप्रयोगास प्रेक्षकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद*


लातूर दि.11/11/2022
ऑल इंडिया लिनेस क्‍लबच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात ठेवण्यात आलेल्या “आमने सामने” या नाट्यप्रयोगास नाट्यप्रेमीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“आमने सामने” या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून लिव्ह ईन रिलेशनशीप व रितसर विवाह करून संसारीक वाटचाल करीत असलेल्या दोन कुटुंबातील प्रसंगाचे वास्तव मांडण्यात आले. तसेच संघर्षमय वाटचालीनंतर समोपचाराने पुन्हा एकत्र येवून आनंदाने संसारीक जीवन मांडण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात आलेला आहे. अतिशय मराठमोळ्या भाषेतील संवादाचा आंतरभाव केल्यामुळे प्रेक्षकांतून ओसांडलेला हास्यकल्‍लोळ आणि समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे या नाट्य प्रयोगातून समोर आलेले आहे.

“आमने सामने” या नाट्यप्रयोगाच्या प्रारंभी ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5 हिरकणीच्यावतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा सत्कार ऑल इंडिया लिनेस क्‍लबच्या सचिव लि.अर्चना नलावडे यांच्याहस्ते करण्यात आला. भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा सत्कार लिनेस क्‍लबच्या साधना पळसकर यांच्याहस्ते  पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक नरवाडे यांचा सत्कार लिनेस क्‍लबच्या कुसूमताई मोरे यांच्याहस्ते करण्यात आला तर “आमने सामने” नाट्यप्रयोगातील कलाकार व कांदे-पोहे, ठिपक्याची रांगोळी या मालिकेतील मंगेश कदम यांचा सत्कार लिनेस क्‍लबच्या प्रांतपाल सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच लिना भागवत यांचा सत्कार राजमाने यांच्याहस्ते करण्यात आला. कलाकार रोहन गुजर यांचा सत्कार विद्याताई देशमुख, केतकी पालव यांचा सत्कार रागिणी देशमुख व नंदकुमार वाकडे यांचा सत्कार अर्चना नलावडे यांच्याहस्ते करण्यात आला. नाट्यप्रयोगादरम्यानच्या सत्कार समारंभाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी केले.  


2021 चा झी गौरव, मटा सन्मान, झी कॉमेडी अवार्ड अशी अनेक पारितोषिके मिळालेल्या या नाटकास लातूरच्या नाट्यप्रेमींतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद या नाट्यप्रयोगाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया लिनेस क्‍लबच्या प्रांताध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, मल्टिपल सेक्रेटरी-टे्रजर डिस्ट्रिक्टच्या सचिव लि.अर्चना नलावडे, लि.साधना पळसकर यांच्यासह लिनेस क्‍लबच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]