30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeउद्योग*ऑल इंडिया पारीक महासभा राष्ट्रीय प्रवक्तापदी नरसिंह पारीक*

*ऑल इंडिया पारीक महासभा राष्ट्रीय प्रवक्तापदी नरसिंह पारीक*

इचलकरंजी/प्रतिनिधी
येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) चे संचालक आणि पारीक समाजातील उद्योजक नरसिंह पारीक यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी तर राजेंद्र बोहरा यांची राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून रामस्वरुप पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे.
नवीदिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पारीक महासभेची बैठक पार पडली. त्यामध्ये ऑल इंडिया पारीक महासभेचे अध्यक्ष बाबुलाल पारीक व महामंत्री धर्मेंद्र पारीक यांनी या निवडी जाहीर केल्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात नरसिंह पारीक यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभागी होत असतात. तसेच वस्त्रोद्योजक म्हणून त्यांचा नांवलौकिक आहे. यशवंत प्रोसेसचे व्हा. चेअरमन व नवमहाराष्ट्र सूत गिरणीचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्याचबरोबर उद्योगपती राजेंद्र मदनलाल बोहरा यांचेही सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्यांनी हरिद्वार भवन, गायत्री भवनचे कार्याध्यक्ष आणि रोटरी व लायन्स या संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. या कार्याची दखल घेत नरसिंह पारीक यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी तर राजेंद्र बोहरा यांची राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]