28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्या*ऐन सणासुदीच्या काळात वीज ग्राहकांना शाँक*

*ऐन सणासुदीच्या काळात वीज ग्राहकांना शाँक*

घरगुती वापराचे बिल चक्क लाखात!

वडवळ नागनाथ दि.३० – ( प्रतिनिधी) -शहरा सोबतच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य बिल मिळावे म्हणून महावितरणने डिजिटल मिटर बसवून फोटो रिडींग सुरू केली. ऐन सणासुदीच्या दिवसांत महावितरणे सर्व सामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले देण्याचा प्रताप केला असून येथील अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळेच महावितरण कार्यालयाने दररोजच्या घरगुती वापराचे एक महिन्याचे लाईट बिल चक्क लाखांत दिल्याने ग्राहकांतुन तीव्र संताप व्यक्त होत असुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वीज ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी तसेच वीज चोरी करणाऱ्यावर आळा घालण्यासाठी महावितरणने नवीन इलेक्ट्रॉनिक्स् डिजिटल मिटर बसवून विविध माध्यमातून वीज बचतीचा संदेश देण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांनी आवश्यक तेवढा वापर सुरू करून सर्वात महाग असणारे एलईडी बल्ब घराघरात बसविले आहेत. मात्र महावितरण अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे वाजवी पेक्षा जास्त म्हणजे अव्वाच्या सव्वा बिल दिले जात असून बिल दुरूस्तीसाठी ग्राहकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
वडवळ नागनाथ येथील रामराव गणपती शिंदे यांना दोन बल्ब, एक टिव्ही, एक फॅनचे एक महिन्याचे लाईट बिल चक्क ९४८३० हजार रुपये तर, जानवळ येथील गायकवाड बी.एल. यांना एक महिन्याचे लाईट बिल ९०००० हजार रूपये, गणपत शंकर राव भांजी यांना ८३००० रूपये देण्याचा प्रताप महावितरणने केला आहे. चाकूर येथील महावितरण कार्यालय ग्रामीण भागातील ग्राहकांची वीज बिले आकारताना विजेचा वापर लक्षात घेत नाही ग्राहकांना वीज बिले रिडींग न घेताच दिली जातात. येथील दीडशेहुन अधिक ग्राहकांना दहा हजारांपेक्षा जास्त बिलाची आकारणी महावितरणने केली आहे. कार्यालयात बसून अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत ग्राहकांना रिडींग घेऊन बिल देणे कायदेशीर बंधनकारक असतानाही अंदाजित बिले देण्यात येतात. हे बिल दुरूस्त करण्यासाठी काही ग्राहकांना महावितरणच्या सहायक कार्यालयात चकरा माराव्या लागतात. बिल दुरूस्ती साठी कर्मचाऱ्यांची मनधरणी करावी लागते. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे मात्र ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एजन्सीच्या चुकिमुळे वाढिव बिले आली आहेत. याबाबत बिलाच्या दुरूस्तीसाठी आम्ही अर्ज पाठवत आहोत. मागिल काळात चुकिच्या बिला संदर्भात सहायक कार्यालयात दोन वेळा सुचना अहवाल दिला होता. संबंधितांनी या एजन्सीवर कारवाई केली असल्याचे शाखा अभियंता हर्षल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]