29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeताज्या बातम्या*एसटीबसला मध्यप्रदेशात भीषण अपघात; १३ ठार*

*एसटीबसला मध्यप्रदेशात भीषण अपघात; १३ ठार*


बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली
धार (म.प्र.), मध्य प्रदेशातील इंदूरहून अंमळनेरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस धार जवळच्या नर्मदेच्या पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ जणांना वाचवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. धार येथून ही बस अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]