28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिकएमजीएमची गतिमान - दिशादर्शक दोनवर्षपूर्ती

एमजीएमची गतिमान – दिशादर्शक दोनवर्षपूर्ती

दोन वर्षापूर्वी नेमकं याच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात


मी पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाची संचालक व अधिष्ठाता पदाची जबाबदारी सोडून महात्मा गांधी मिशनमध्ये डायरेक्टर जनरल ( शैक्षणिक ) पदावर आदरणीय इंजि. अंकुशराव कदम यांच्या सुसंस्कृत नि प्रेमळ आग्रहाने रूजू झाले होतो. याबाबत पुण्यातून औरंगाबादला आणण्यासाठी प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी पुढाकार घेतला होता. स्वयंअर्थसहाय्यित एमजीएम विद्यापीठाच्या स्थापनेची पूर्वतयारीची पूर्ण जबाबदारी कदम सरांनी सोपवली होती. आणि २०१९ जुलै महिन्यात एमजीएम विद्यापीठ या मराठवाड्यातील पहिल्यावहिल्या खाजगी विद्यापीठाचा क़ायदा विधीमंडळाने पास करून तो ऑगस्ट २०१९ ला अमलात आला नि महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय सचिव पातळीवरील समितीची अंतीम अभ्यास भेंट झाली नि त्यांचेसमोर एमजीएम विद्यापीठाचे सादरीकरण करण्याची संधी कदम सरांनी माझ्यावर सोपविली व प्रधान सचिव यांनी आमचं कौतुक केलं. एमजीएम विद्यापीठ व्हायला पूर्णपणाने सक्षम असल्याचा अहवाल दिला आणि ९ सप्टेंबर २०१९ ला विद्यापीठ शासनाच्या गँझेट प्रकाशनानुसार कार्यान्वित झालं नि एमजीएम विद्यापीठाचा उदय झाला. या विद्यापीठाची स्थापना करण्याची कल्पना मंत्रालयातील तत्कालीन उपसचिव सिध्दार्थ खरात यांनी एमजीएमच्या प्रेरणा दळवी व त्यांच्यासोबत गेलेल्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांचेसमोर मांडली . प्रयोगशील कदम सरांनी या कल्पनेला पाठींबा दिला नि पुढे जा असा आशिर्वाद दिला नि मग एमजीएम विद्यापीठाची मोहीम सुरू झाली. तत्कालीन उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे व प्रधान सचिव यांनी साथ दिली. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रीमंडळ बैठकीत ठराव मंज़ूर केला . स्थानिक आमदार नि माजी मंत्री अतुल सावेंनीही मन:पूर्वक पाठबळ दिलं नि मराठवाड्यातलं पहिलं वहिलं स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ अस्तित्वात आलं. मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातील एक नवा इतिहास रचला गेला. मला अंकुशराव कदम सरांनी संस्थापक कुलगुरू बनण्याचा सन्मान दिला नि आमच्या टीमला भरीव काम करता आलं. संस्थापक कुलसचिव डॉ. आशिश गाडेकर नि डीनची टीम तयार झाली . प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, प्रा. डॉ. गंगाधर निकम, प्रा. डॉ. सूर्यभान सन्नासे,प्रो. डॉ. मार्क लिंडले, वित्त व लेखा अधिकारी भरत पेंटावार , परीक्षा नियंत्रक कर्नल डॉ.प्रदीपकुमार ,गुरू पार्वती दत्ता , प्रा. डॉ. संजय हरके, प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख , प्राचार्य डॉ. रेखा शेळके ,प्रा. शुभा महाजन , प्रा. डॉ. विजया मुसांडे,डॉ. रश्मी जायभाये ,उपकुलसचिव प्रेरणा दळवी , प्राचार्य डॉ. तसनीम पटेल , मार्केटिंग वब्रँडींग डायरेक्टर देबॉशिश पॉल , प्रा. भावसार व अनिकेत जोशी , आय. टी प्रमुख प्रा. मोरे , प्रा.राजलक्ष्मी भोसले, , ऐश्वर्या जोशी भाग्यश्री केंडे ,चंद्रकांत धावडे, सिध्दीका दळवी ,हरीश नाचण , निलेश बनसोड , राजेंद्र जाधव व विद्या शिर्के आदिंनी कामात झोकून दिले. प्राध्यापक व विभागप्रमुखांनी अभ्यास मंडळं तयार केली. १११ पदवी, पदव्युत्तर , पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम युजीसीच्या लर्निंग आऊटकम बेस्ड करीक्युलम फ़्रेमवर्क ( LOCF) व चॉइस बेस्ड क्रीडीट सिस्टीम ( CBCS ) नुसार तयार केले. आक्टोबर २०१९ ला विद्यापीठ कार्यरत झाल्याने २५८ विद्यार्थी प्रवेशित होऊन सुरूवात झाली. एमजीएमचे आधारस्तंभ व वयोवृद्ध नेते शरद पवार साँचे शुभहस्ते विद्यापीठाचे भव्य उदघाटन हजारोंच्या उपस्थितीत नेत्रदिपकरितीने झाले. कोरोना संकटाची सहा – सात महिन्यांची महाविपदा धीराने सहन करीत व त्यावर मात करीत आम्ही काम करू शकलो. विद्या परिषदेची बैठक , व्यवस्थापन मंडळाची व नियंत्रक मंडळाची , परीक्षा मंडळाची रचना अशी अधिकार मंडळाची स्थापना केली गेली. २०२०-२१ साठी प्रवेशाचे संकट जगभर कोरोनामुळे असताना आम्ही सारे दीडहजारहून अधिक प्रवेश कष्टपूर्वक करू शकलो आहोत. १० देश – विदेशातील संस्थांशी एमओयू करता आले. युजीसीचे २ ( एफ) स्टेटस नि एआययूचे सदस्यत्व , अंतराष्ट्रीय विद्यापीठ संघटनेचे सदस्यत्व , एशिया- पँसेफीक क्वालिटी नेटवर्कचे सदस्यत्व घेता आले.या कामात गेली दोन वर्षे मला खारीचा वाटा उचलता आला याचा अभिमान आहे. बघता बघता दोन वर्षे कधी संपली ते कळलंच नाही. धन्यवाद अंकुशराव कदम सर , कमलकिशोर कदम सर , डॉ. पी. एम जाधव , प्राचार्य प्रतापराव बोराडे सर , डॉ. सुधीर कदम , विश्वास कदम , डॉ. नितीन कदम आणि सर्व सहकारी प्राचार्य व प्राध्यापक नि कर्मचारी यांचे सहयोगाबद्दल !

सुधीर गव्हाणे ,औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]