मुंबई, २५ मे २०२२: आशियामधील सर्वात मोठा शैक्षणिक समूह श्री चैतन्यचे पाठबळ असलेला इन्फिनिटी लर्न या झपाट्याने विकसित होणा-या एडटेक ब्रॅण्डने कंपनीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज आणखी एक क्षेत्र ‘इन्फिनिटी फ्यूचर्ज’मध्ये प्रवेश केला. इन्फिनिटी लर्नने विझक्लबला संपादित केले. बिझक्लब हे सर्वांगीण संज्ञानात्मक विकास एडटेक स्टार्ट-अप आहे, जी तिच्या एचओटीएस (हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स) आणि स्मार्टटेक उपक्रमांच्या माध्यमातून ६ ते १४ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तमतेची निर्मिती करते.
हे कार्यसंचालनाच्या पहिल्या वर्षामध्येच इन्फिनिटी लर्नचे तिसरे संपादन असेल. यापूर्वी कपंनीने शिक्षक समुदायाचे डिजिटल व्यासपीठ ‘टीचर’ आणि संकल्पना-आधारित बहुभाषिक कन्टेन्ट व्यासपीठ ‘डोण्ट मेमराइज’ यांचे संपादन केले आहे.
इन्फिनिटी फ्यूचर्जचा या दशकामधील विद्यार्थ्याला भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत कौशल्ये समाविष्ट करत त्यांचा इन्फिनिटी लर्न ऑफरिंग्जचा विद्यमान पोर्टफोलिओ के१२ विभागापर्यंत वाढवण्याचा मनसुबा आहे. विश्लेषणात्मक विचार, जटिल समस्या सोडवणे, क्रिटिकल थिंकिंग, इनोव्हेशन, अॅक्टिव्ह लर्निंग आणि समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता यांसारख्या एचओटीएसची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल.
पुढील २४ महिन्यांमध्ये इन्फिनिटी लर्न इन्फिनिटी फ्यूचर्जसह बहुवार्षिक प्रवासामध्ये १ दशलक्षहून अधिक विद्यार्थी सामील होण्याची अपेक्षा करत आहे. कंपनी यंदाच्या वर्षामध्ये फ्यूचर्जच्या माध्यमातून विझक्लब ऑफरिंग्ज इंग्रजी भाषिक देशांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील करणार आहे.
इन्फिनिटी लर्न बाय श्री चैतन्यच्या संचालक सुषमा बोप्पाना म्हणाल्या, ”आम्हाला प्रत्येक मुलाला त्यांच्या अध्ययन प्रवासाची सर्वोत्तम सुरूवात देण्याच्या आणि त्यांना २१व्या शतकातील विश्वासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह सुसज्ज करण्याच्या आमच्या मिशनसाठी इन्फिनिटी लर्नसोबत बिझक्लब टीमने केलेल्या सहयोगाचा आनंद होत आहे. आम्ही योग्य वेळी, योग्य माध्यमामधून योग्य कौशल्यांचे अध्यापन करत हे कार्य करतो. आम्हाला माहित आहे की, विझक्लब डिजिटल प्रोग्रामच्या माध्यमातून सर्वात प्रभावीपणे शिकवले जाते आणि त्यांच्यासोबत आमचे दर्जात्मक, पुरस्कार-प्राप्त उत्पादन आहे, जे आम्हाला इन्फिनिटी लर्न समूहामध्ये आणण्याचा आनंद होत आहे.”