उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

0
216

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा

प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा

— वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई दि. ७ जूलै :

उस्मानाबाद येथे नव्याने उभाराव्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एनएमसी) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित  देशमुख यांनी आज दिले.

उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव संजय सुरवसे, आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर  आवश्यक असणारी जमीन ताब्यात घेणे, वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणे याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उस्मानाबाद येथील महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी आणि याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल असेही श्री. देशमुख यांनी योवळी सांगितले.

उस्मानाबाद येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे 100 प्रवेश  क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नीत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजे 25 एकर जागा लागणार आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी  यांनी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

—————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here