आ. अभिमन्यू पवार यांनी रक्तदान करून केले शिबिराचे उद्घाटन..
औसा – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने औसा विधानसभा भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २९९ जणांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वतः हा आ. अभिमन्यू पवार यांनी रक्तदान करून केले. याचबरोबर मतदारसंघात विविध ठिकाणी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, निराधार, दिव्यांग, श्रावणबाळ व इतर शासकीय योजनांचे लाभार्थी असलेल्या नागरिकांना घरपोच उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
दि. २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त औसा विधानसभा मतदारसंघ व लातूर शहर येथे औसा भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात लोदगा १११, औसा ६२, मदनसुरी ४१, तपसे चिंचोली ३५, लातूर शहर ५० असे २९९ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन औसा येथील हनुमान मंदिर येथे आ. अभिमन्यू पवार यांनी स्वतः हा रक्तदान करून केले. याचबरोबर लोदगा येथे आयोजित रक्तदान शिबिरास आ. अभिमन्यू पवार यांनी भेट दिली.
याठिकाणी वृक्षारोपण तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या वितरित केल्या.खुंटेगाव येथे निराधार, दिव्यांग, श्रावणबाळ व इतर शासकीय योजनांचे लाभार्थी असलेल्या येथील १९३ नागरिकांना घरपोच उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा उपक्रम औसा भाजपच्या वतीने राबविण्यात आला, यावेळी आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते ५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरित केले.यावेळी लातूर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरालाही आ. अभिमन्यू पवार यांनी भेट दिली.तपसे चिंचोली येथील रक्तदान शिबिरास यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी भेट दिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी औसा भाजपच्या वतीने औसा येथील मूकबधिर विद्यालयात खाऊ आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. हसलगण/ संक्राळ जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.