उद्यानाच्या माध्यमातून महात्मा गांधी मार्केट
येथे एक नवीन विरंगुळा केंद्र
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम
- उद्यानात लातूरकरांना निसर्गाचा आनंद
- उद्यान लातूर शहराच्या सौंदर्यात भर घालणार
लातूर ; ( वृत्तसेवा )- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरातील प्रभाग ८ मधील महात्मा गांधी मार्केट येथे सर्व सोयीसुवीधायुक्त उद्यान सेवेत सुरू झाले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लातूरकरांना नवीन विरंगुळा केंद्र मिळाल आहे. या उद्यानात लातूरकरांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. तसेच, हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणारे झाले आहे.

मंगळवार २३ जानेवारी रोजी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उदयानाचे नुतनीकरण व दुरूस्ती कामाची पाहणी केली, उद्यानातील केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. लातूर शहरातील विशेषता महात्मा गांधी मार्केट येथील व्यापारी, विदयार्थी आणि नागरीक यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन ही जागा दुर्लक्षित असून या जागेवर सुशोभीकरण व्हावे अशी मागणी केली होती. त्यांनी येथे उद्यानाची निर्मिती करण्यासाठी सुमारे ८० लाख २५ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्या करीता पुढाकार घेतला.

उद्यानाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम
लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उद्यानाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम साकारला आहे. उद्यानात लहान मुलांसाठी हिरवळीवर खेळण्यासाठी लॉन तयार करण्यात आला आहे. तसेच, विरंगुळा म्हणून फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक करण्यात आले आहे. व्यापारी, नागरीक, प्रवासी यांना निवांतपणे बसण्यासाठी विसावा व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारच्या वेळी भोजन करण्यासाठी व विश्रांतीसाठी मोकळी जागा विश्रांतीगृह (डायनींग एरिया) आहे. कौटुंबिक छोटेखानी कार्यक्रम करता यावेत यासाठी सुवीधा केली आहे.

विविध फुलझाडे आणि वृक्ष लागवडीमुळे
उद्यानाला एक वेगळीच ओळख
उदयानात अदययावत सुवीधेसह सुशोभीकरण करण्यासाठी विविध प्रकारची फुल झाडे आणि वृक्ष लावण्यात आले आहेत. यामध्ये गुलाब, चाफा, मोगरा, रातराणी फुलझाडे आहेत तर कडेनी बांबू लावण्यात आले आहेत. उद्यानातील सुशोभीकरणामुळे परिसराची देखील शोभा वाढली आहे. उदयानाची देखभाल करण्यासाठी आवश्यक पाण्यासाठी विंधन विहीर (बोअर) घेवून पाण्याची व्यवस्था केली आहे.
उद्यानातील फुलझाडांची मोहिनी, गुलाबाचा मोहक सुगंध, चाफ्याची शांत सुगंध, मोगऱ्याचा आणि रातराणीची सुगंध या उद्यानाला एक वेगळीच ओळख निर्माण करून देत आहे.
येथे येणाऱ्यासाठी स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था आहे. उदयानाचा वापर करता यावा यासाठी हेरीटेज लाईटचा वापर करून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सुरक्षा रक्षकासाठी केबीन सुवीधा असून सर्व मुलभूत सुविधा दर्जेदार उभारण्यात आल्या आहेत. यामुळे उदयान पाहता क्षणी मनमोहक स्थळ म्हणून पसंतीस पडेल असे ठिकाण झाले आहे.

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात अभिनव प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे वास्तु विशारद पुणे येथील नामांकित श्री महेश नामपुरकर आहेत तर या प्रकल्पाचे बांधकाम काम अभिजीत इगे यांनी पूर्ण केले आहे. या अभिनव उपक्रमाचे लातूर शहरातील व्यापारी, परिसरातील नागरिक यांच्याकडून कौतूक होत आहे.
—-