*उदगीर तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा
*उदगीर (प्रतिनिधी)* उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडा स्तरिय पत्रकारीता पुरस्कार व प्रा.सुरेश पुरी यांना जिवन गौरव पुरस्कार केंद्रिय राज्यमंत्री ना.भगबंत खुब्बा व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाचा वर्ष 2020 चे मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून दिले जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण व प्रा.सुरेश पुरी यांना जिवन गौरव पुरस्कार सोहळा येथील नांदेड रोडवरील उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजय बनसोडे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय खते, रसायन व अपारंपारिक उर्जा राज्यमंत्री ना.भगवंत खुब्बा तर प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे उपस्थितीत राहणार आहेत.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातून मराठवाडास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवून तज्ञ परीक्षक मंडळाच्या मार्फत स्पर्धकांची निवड करण्यात येते.
पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त पत्रकारांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात कोरोना महामारीच्या काळात कार्य करणार्या आरोग्य,महसुल, नगरपरिषद व पोलिस विभाग प्रमुख यांचा पाहूण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उदगीर शहर व परिसरातील पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे सचिव दयानंद बिरादार व पदाधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.