इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा

0
29

हंसराज जाधव,विठ्ठल खिलारी,
सफरअली इसफ यांना संस्कृती साहित्य पुरस्कार जाहीर

इचलकरंजी/(प्रतिनिधी )इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे यावर्षीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हंसराज जाधव, विठ्ठल खिलारी , सफर अली इसफ यांना संस्कृती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

यामध्ये कथा विभागात दगडूलाल मर्दा स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी हंसराज जाधव यांच्या ‘ मोहरम’ या कथा संग्रहाची तर कादंबरी विभागात लक्ष्मण कांबळे ( जिंदा ) स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी विठ्ठल खिलारी यांच्या ‘ सवळा ‘ या कादंबरीची आणि काव्य विभागात वसंत-कमल स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर ‘ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार विजेत्यांची निवड समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे, समीक्षक प्रा.डॉ रमेश साळुंखे या परीक्षकांनी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.सदर पुरस्कारांचे वितरण इचलकरंजी येथे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या संस्कृती साहित्य संमेलनात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here