इचलकरंजी भाजप कार्यालयाचे सोमवारी मंञी चंद्रकांतदादा पाटलांच्या हस्ते उद्घाटन
शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांची माहिती
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी भाजप पक्षाच्या नूतन कार्यालयाचे सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आम. सुरेशराव हाळवणकर असणार आहेत.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपा शहराध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष ॲड. अनिल डाळ्या यांनी पञकारांशी बोलताना दिली.
अधिक माहिती देताना श्री.डाळ्या म्हणाले की ,६ एप्रिल १९८० साली भाजप पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत इचलकरंजी भाजपचे एकूण १४ अध्यक्ष झाले. शहरामध्ये स्वतःचे पक्ष कार्यालय असावे यासाठी कार्यकत्यांनी १९८३ साली भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने निधी गोळा करून व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने कार्यालय खरेदी केली. एक छोटेसे रोपट लावले होते त्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.या काळात जसे कार्यकर्ते वाढत गेले तसे पक्ष कार्यालयाची व्याप्ती वाढत गेली. १९८३ ला पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर इचलकरंजीचे स्वमालकीचे भाजप कार्यालय स्थापन झाले. देशभर पक्ष वाढीसाठी, संघटन मजबुत करण्यासाठी फिरत असताना या नुतनीकरण केलेल्या कार्यालयात भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, स्व. प्रमोद महाजन, स्व गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे अशी अनेक नेतेमंडळी यांचे निवास म्हणून वापर केला व पक्ष संघटन मजबूत केले. इचलकरंजी शहरामध्ये जनसंघ ते भाजप असा प्रवास करत असताना पक्षाच्या वतीने सातत्याने विविध आंदोलने, मोर्चाच्या माध्यमातून विधायक कामे करून सामान्य जनतेला न्याय द्यायचे काम केले. भाजप पक्षामार्फत काम करत असताना आणीबाणीच्या काळात राम मंदिर आंदोलन अशा अनेक प्रसंगी इचलकरंजीचे सर्वाधिक कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते. अशा या ऐतिहासिक वास्तूचे आधुनिक नूतनीकरण करण्याचा मानस शहराध्यक्ष अनिल डाळ्या व त्यांच्या सर्व पदाधिका-यांनी प्रदेश उपाध्यक्ष ,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवला व त्याला आज मुहूर्तस्वरूप प्राप्त झाले. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व भाजप पदाधिकारी , आजी माजी नगसेवक ,कार्यकर्ते व इचलकरंजी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी केले आहे.या पत्रकार बैठकीस भाजपा जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजू, पांडुरंग म्हातुकडे, महिला अध्यक्ष सौ. पूनम जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण पाटील, सरचिटणी अरुण कुंभार, अमर कांबळे, शहाजी भोसले, अमृतमामा भोसले, उमाकांत दाभोळे, प्रदीप मळगे, उत्तमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.