39.4 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeठळक बातम्या*इचलकरंजीत रामलिंग कावड याञेचे उत्साहात स्वागत*

*इचलकरंजीत रामलिंग कावड याञेचे उत्साहात स्वागत*

विश्व हिंदू परिषदेने पुष्पवृष्टी करत घेतले दर्शन

इचलकरंजी ; दि.२६ ( प्रतिनिधी ) – इचलकरंजी येथेराजस्थानी युवक मंडळाच्या वतीने
श्रावण महिना निमित्त काढण्यात आलेल्या
श्री क्षेत्र रामलिंग कावड याञेचे पुष्पवृष्टी व हर हर महादेव ,जय श्रीराम असा जयघोष करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या
पदधिका-यांसह सदस्य व भाविकांनी कावड याञेचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याने भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

वर्षभरात आषाढी महिन्यानंतर येणारा श्रावण हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो.
या पवित्र महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पुजेचे विशेष महत्व आहे.त्यामुळे स्वतःच्या घरातून कावड घेऊन शिवलिंग जलाभिषेक करण्याची परंपरा हजारो वर्षापासून हिंदू धर्मात व भारत देशात आहे. याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी येथे राजस्थानी युवक मंडळाच्या वतीने इचलकरंजी ते श्री क्षेत्र रामलिंग अशी कावड यात्रा आयोजित करण्यात येते.ही परंपरा खूप वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे.यंदाच्या वर्षी देखील श्रावण महिना निमित्त इचलकरंजी ते श्री क्षेत्र रामलिंग अशी कावड याञा आयोजित करण्यात आली आहे.आज सोमवारी सकाळी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत कापड मार्केट येथून कावड याञेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राधाकृष्ण चौकात श्री क्षेत्र रामलिंग कावड याञेचे पुष्पवृष्टी व हर हर महादेव ,जय श्रीराम असा जयघोष करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.तसेच कावड याञेचे पुजन करत दर्शन घेण्यात आले.यावेळी भाविकांनी कावड याञेचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याने भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर सदर कावड याञा श्री क्षेत्र रामलिंग तिर्थक्षेञाकडे प्रस्थान करण्यात आली.यावेळी हर हर महादेव व जय श्रीराम अशा नामघोष करत कावड याञा रामलिंग तिर्थक्षेञावर पोहचताच त्याठिकाणी कावड याञेकरुंनी शिवलिंगावर जलाभिषेक करत विधीवत पुजन करुन दर्शन घेतले.यानंतर महाप्रसाद वाटप करुन या याञेचा समारोप करण्यात आला.
इचलकरंजी येथे राधाकृष्ण चौकात कावड याञेचे स्वागत करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे शिवप्रसाद व्यास, पंढरीनाथ ठाणेकर, सौ. रेवती हनमसागर, सौ. अरुणा माने, सनत दायमा ,मुकेश दायमा, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, प्रताप घोरपडे, महेश ओझा, मारुती शिंगारे, हरीष पसनुर, अनिल सातपुते, मुकुंदराज उरुणकर, अनिकेत रोकडे, विशाल खोत,विनायक पोवार, ऋतिक बुगड, संकेतसिंह शिंदे, महेशराज भिंगवडे अरविंद शर्मा, बाळकृष्ण तोतला, नरोत्तम लाटा, ब्रिजेश दायमा, सुजित कांबळे, अमोल शिरगुप्पे ,आनंदा मकोटे, अशोक पुरोहित, तेजस कडव , विशाल खोत , पंडीत काळे , महांतेश पाटील , दादासो मोरे , सुशांत पाटिल , प्रशांत रोड्डे , विद्येश हजारे व हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]