इचलकरंजी:( प्रतिनिधी )-तंत्रज्ञानाशी सांगड घालून पत्रकारिता करता यावी याकरिता इचलकरंजी शहरात अद्ययावत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने , आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
इचलकरंजी शहरातील पत्रकारांसाठी असलेल्या पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यातून नूतनीकरण करण्यात आलेल्या या कक्षाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी शहरातील सामाजिक भान ठेवून करत असलेल्या पत्रकारितेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उन्हातान्हात कशाचीही तमा न बाळगता सेवा व्रत घेऊन करत असलेल्या पत्रकारांना त्यांनी धन्यवाद दिले. इचलकरंजी शहराला साजेशे असे पत्रकार कक्ष तयार झाले आहे परंतु भविष्यात स्वतंत्रपणे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली यासाठी पालिकेने पत्रकार भवन साठी जागा देण्याची मागणी ही त्यांनी केली.

आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणामध्ये इचलकरंजीच्या नावलौकिकास साजेल असा अद्ययावत पत्रकार कक्ष उभारला असल्याचे नमूद करून आणि शहरात आणखीन एक पत्रकार भवन उभारण्यासाठी जे सहकार्य लागेल ते देण्याचे अभिवचन दिले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयात प्रवेश करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वागत
अरुण काशीद यांनी केले. प्रस्ताविक ज्येष्ठ पत्रकार संजय खुळ यांनी केले. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव, इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, अतुल आंबी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी विशेष योगदान आणि सहकार्य केल्याबद्दल पत्रकार अरुण काशीद, शरद सुखठणकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
जिल्हाप्रमुख रविंद्र माने,माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन दयानंद लिपारे यांनी केले तर आभार सुभाष भस्मे यांनी मानले. कार्यक्रमास इचलकरंजी शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार, राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक,शैक्षणिक, मनोरंजन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.