16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा*

*इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा*

इचलकरंजी/प्रतिनिधी –
वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.
प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरात मातीचे बैल आणून त्यांची हरभरर्‍याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पुजा करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला.
सायंकाळी शतकोत्तर परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने गावभागातील महादेव मंदिरनजीक पारंपारिक पध्दतीने कर तोडण्याचा कार्यक्रम
देवाशिष पाटील, शिवाशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त सुधाकर देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे आदी मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


लाकूड ओढणे शर्यतीत दोन दाती गटात दिलीप पांडुरंग पाटील (प्रथम), रामा दत्तात्रय नंदनवाडे (द्वितीय), जोतिबा बाळू गायकवाड (तृतीय) तर ओपन गटात प्रकाश तळप (प्रथम), महंतेश अनिल पाटील (द्वितीय) व निलेश गजानन घोडके (तृतीय) यांच्या बैलांनी यश मिळविले. सुट्टा बैल पळविणे स्पर्धेमध्ये मोईन महंमदमिरा मोमीन यांच्या बैलाने प्रथम, स्वप्निल कोळी यांच्या बैलाने द्वितीय तर विजय तानाजी मोरे यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला.
याप्रसंगी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, डॉ. राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, बाबासाहेब पाटील, राहुल घाट, गजानन लोंढे, प्रशांत कांबळे, एम. के. कांबळे, चंद्रकांत पाटील, सुभाष जाधव, किशोर पाटील, नरसिंह पारीक, शैलेश गोरे, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, राजेंद्र बचाटे, सागर मगदूम, पापालाल मुजावर, राजू कलावंत, शांतापा मगदूम, शिवाजी काळे, राजेंद्र दरीबे, बजरंग कुंभार, सागर गळदगे, आरिफ आत्तार, सागर कम्मे आदींसह गावकामगार पाटील, पोलिस पाटील यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]